BJP-TDP Alliance Raises : भाजपला मिळणार तगडा साथीदार ; कर्नाटकातील पराभवानंतर दक्षिणेचं व्दार खुलं..

Amit Shah Meet With Chandra babau Naidu : पुन्हा एकदा टीडीपी आणि बीजीपी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Amit Shah Meet With Chandra babau Naidu
Amit Shah Meet With Chandra babau Naidu Sarkarnama
Published on
Updated on

Amit Shah Meet With Chandra babau Naidu : तेलुगु देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी शनिवारी भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. (bjp amit shah meet with tdp chandra babau naidu speculation of bjp tdp alliance raises)

या बैठकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे दिसते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपला दक्षिणेचं व्दार खुले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Amit Shah Meet With Chandra babau Naidu
Nana Patole News : 'भावी मुख्यमंत्री' यादीत आणखी एका नावाची भर ; काँग्रेसच्या नेत्याचे बॅनर झळकले ; राजकीय चर्चांना उधाण

अमित शाह आणि नायडू यांच्यामध्ये तासभर बैठक झाली. यात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण या दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार की नाही बाबत निर्णय अद्याप गुलदस्तात आहे. एनडीएमधून बाहेर पडणारा चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी हा पहिला पक्ष होता. आता भाजप आणि टीपीडी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे, असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

दोन महिन्यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. देशाला विकासाच्या चालना देण्यासाठी मोदींना पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार आहे, असे नायडू म्हणाले.

Amit Shah Meet With Chandra babau Naidu
Odisha Triple Train Accident : रेल्वे अपघातानंतर वरुण गांधींनी खासदारांना केली ही विनंती

"२०१८ मध्ये टीडीएसने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन एनडीए संपुष्टात आले होते. अर्थंसंकल्पात निधी देण्यासंदर्भात आंध्रप्रदेशाकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो," असे चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.

Amit Shah Meet With Chandra babau Naidu
BJP Leader Prasanta Basunia Shot Dead : घरात घुसून BJP नेत्यावर गोळी झाडली ; TMC वर संशयाची सुई ; भाजप नेते आक्रमक..

अमित शाह आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा टीडीपी आणि बीजीपी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी आनंदाची बाब असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आंध्रप्रदेश आणि दक्षिण भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी हे मोठं पाऊल असल्याचे समजले जाते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com