BJP VS TMC in JPC Meeting :वक्फ विधेयकाबाबत आज(मंगळवार) झाले्लया संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी आपसात भिडले, यामध्ये कल्याण बॅनर्जी जखमी झाले.
जेपीसी बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्यानंतर कल्याण बॅनर्जींनी संतापच्या भरात टेबलवरच पाण्याची काचेची बाटली फोडली, ज्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. परिणामी त्यांना चार टाकेही लागले आहेत.
या वादामुळे बैठकी थोडावेळासाठी स्थगित करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, कल्याण बॅनर्जींनी अचानक बाटली उचलली आणि बाकड्यावर फोडली. यामुळे त्यांना स्वत:लाच दुखापत झाली. ही बैठक संसद परिसरात झाली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीस अनेक निवृत्त न्यायाधीश, वरिष्ठ अधिवक्ता आणि अभ्यासक उपस्थित होते. या दरम्यान कल्याण बॅनर्जी उठून बोलू लागले. ते याआधीही बैठकीत अनेकदा बोलले होते. मात्र यावेळी जेव्हा ते मध्येच बोलू लागले, तेव्हा अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला.
यानंतर मग कल्याण बॅनर्जींनी अभिजीत गंगोपाध्याय यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यामुळे भडकलेल्या गंगोपाध्याय यांनीही त्यांना तशाच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आणि वाद उफाळला. दरम्यान कल्याण बॅनर्जींनी काचेची बाटली बाकावर फोडली, ज्यामुळे ते जखमी झाले.
वक्फ विधेयकावरील जेपीसीच्या बैठकीत कायमच गोंधळ होत आलेला आहे. मागील आठवड्यातही जोरदार गदारोळ झाला होता. ज्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी वॉकआउट केले होते. प्राप्त माहितीनुसार विरोधी पक्षाच्या खासदारांनी भाजप(BJP) खासदारांवर त्यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे. तसेच विरोधी खासदारांचा असाही आरोप आहे की, या दरम्यान समिती अध्यक्ष जगदंबिका पाल यांनीही भाजप खासदारांवर काहीच कारवाई केली नाही. तर दुसऱ्या बाजूला भाजप खासदारांचे म्हणणे आहे की अपशब्द विरोधी पक्षाच्या खासदारांकडूनच वापरले गेले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.