Bangladesh Crisis : अजूनही शेख हसीनाच पंतप्रधान? राष्ट्रपतींच्या दाव्याने बांग्लादेशात राजकीय भूकंप

Sheikh Hasina President Mohammad Shahabuddin : शेख हसीना या मागील वर्षी बांग्लादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे.
Sheikh Hasina, Mohammad Shahabuddin
Sheikh Hasina, Mohammad ShahabuddinSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा देशात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याबाबत आपल्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बांग्लादेशात विद्यार्थ्यांचे सरकारविरोधातील आंदोलन पेटले होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन करत भारतात आश्रय आहेत. त्या आजही भारतात असल्याचे सांगितले जात आहे. भारतात येण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा होती.

Sheikh Hasina, Mohammad Shahabuddin
Jharkhand Assembly Election : भाजपचा मोठा ‘प्लॅन’ फसला; हेमंत सोरेन यांनी 3 माजी आमदार फोडले

राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या दाव्यामुळे बांग्लादेशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या दाव्यामुळे शेख हसीना याच आजही पंतप्रधान असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हसीना यांनी देश सोडल्यानंतर मोहम्मत युनूस यांची आठ ऑगस्टला अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपतींनी हा दावा केला आहे. सोमवारी ही मुलाखत प्रसिध्द झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. राष्ट्रपतींनी या मुलाखतीत म्हटले आहे की, मी ऐकले आहे की शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडण्याआधी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. पण त्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा आपल्याकडे नाही. खूप प्रयत्न करून पुरावा मिळालेला नाही. बहुतेक त्यांच्याकडे (शेख हसीना) त्यावेळी वेळ नसेल.

Sheikh Hasina, Mohammad Shahabuddin
Sakshi Malik : साक्षी मलिक यांचा मोठा गौप्यस्फोट; बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भाजपच्या महिला नेत्यानेच पेटवलं आंदोलन

देशात पाच ऑगस्ट रोजी घडलेल्या राजकीय घडामोडींची माहिती देताना राष्ट्रपतींनी सांगितले की, सकाळी 10.30 वाजता शेख हसीना यांच्या घरातून राष्ट्रपती भवनात फोन आला. त्या येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली. त्यानंतर तासाभरात पुन्हा एक कॉल आला आणि त्या येणार नसल्याचे सांगण्यात आले. नंतर त्या मला न सांगताच देश सोडून गेल्याचे ऐकायला मिळाले, असा दावाही राष्ट्रपतींनी केला आहे.

दरम्यान, हसीना या देश सोडून गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंतरिम सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रपतींनीच अंतरिम सरकारच्या सल्लागारपती युनूस यांची नियुक्ती करत त्यांना शपथही दिली. त्यामुळे आता राष्ट्रपतींनीच हसीना यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com