Jharkhand Assembly Election : भाजपचा मोठा ‘प्लॅन’ फसला; हेमंत सोरेन यांनी 3 माजी आमदार फोडले

Hemant Soren BJP Louis Marandi Jharkhand Mukti Morcha : हेमंत सोरेन यांच्याविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता असलेल्या महिला नेत्यानेत झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे.
Louis Marandi, Hemant Soren
Louis Marandi, Hemant SorenSarkarnama
Published on
Updated on

Ranchi News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा 2014 च्या निवडणुकीत धक्कादायक पराभव करणाऱ्या महिला नेत्याने भाजपला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे याच महिला नेत्याला भाजपकडून या निवडणुकीतही सोरेन यांच्याविरोधात तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा होती.

झारखंड भाजपच्या माजी उपाध्यक्ष लुइस मरांडी यांनी सोमवारी रात्री झारखंड मुक्ती मोर्चामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी आमदार कुणाल सारंगी आणि लक्ष्मण टुडू यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत सोरेन यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार केदार हाजरा यांनी सोरेन यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

Louis Marandi, Hemant Soren
Sakshi Malik : साक्षी मलिक यांचा मोठा गौप्यस्फोट; बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भाजपच्या महिला नेत्यानेच पेटवलं आंदोलन

मरांडी यांनी 2014 च्या निवडणुकीत दुमका विधानसभा मतदारसंघात सोरेन यांचा पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या 2019 च्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांनी दुमकासह बरहेट मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी दुमका मतदारसंघ सोडल्यानंतर बंधू बसंत सोरेन यांनी पोटनिवडणुकीत मरांडी यांचा पराभव केला होता.

मरांडी यांनी पुन्हा सोरेन यांच्याविरोधात तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा होती. पण त्याआधीच त्यांनी सोरेन यांच्यासोबत जाण्याचा निर्णय़ घेतल्याने पक्षाला धक्का बसला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मरांनी यांनी पक्षातील गटबाजी आणि बाहेरून आलेल्या नेत्यांवरून निशाणा साधला.

Louis Marandi, Hemant Soren
Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला संपवा, 1,11,11,111 रुपये मिळवा; कोणी केली घोषणा?

पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची उपेक्षा होत असल्याची नाराजी मरांडी यांनी प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पक्षात व्यक्त केली आहे. भाजला 2014 मध्ये पहिल्यांदाच दुमका मतदारसंघात विजय मिळाला होता. पण आता पक्षामध्ये गटबाजी वाढत चालली आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना महत्व दिले जात असून पक्षांतर्गत लोकशाहीचा उध्वस्त होत असल्याची टीका मरांडी यांनी पत्रातून केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com