pramod sawant, vishwajit rane
pramod sawant, vishwajit ranesarkarnama

Goa : मुख्यमंत्रीपदावर आज लागणार मोहोर ; राणे की सावंत?

भाजपच्या संसदीय मंडळाने अद्याप गोव्याच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची औपचारिक घोषणा केलेली नाही.
Published on

पणजी : गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. ४० पैकी भाजपने गोव्यात २० जागा पटकावल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) दोन आमदार आणि तीन अपक्षांसह भाजप तिसर्‍यांदा राज्यात सरकार स्थापन करणार आहे. पण मुख्यमंत्री (goa chief minister)कोण होणार? हा पेच अद्याप सुटला नसल्याचं बोललं जातंय.

आज दुपारी याबाबत घोषणा पक्षश्रेष्ठी करणार असल्याने मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपचे केंद्रीय प्रभारी देवेंद्र फडणवीस आज गोव्यात येणार आहेत.

pramod sawant, vishwajit rane
पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांनी 'मावळ' द्यावा, बारणेंना राज्यसभेवर पाठवा!

भाजपने अद्याप सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. होळी साजरी केल्यानंतर पक्ष सरकार स्थापन करेल, असे तानावडे यांनी याआधी पत्रकारांना सांगितले होते. पण भाजपच्या संसदीय मंडळाने अद्याप गोव्याच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची औपचारिक घोषणा केलेली नाही.

प्रमोद सावंत यांच्या नावालाच वरिष्ठ नेत्यांनी पसंती दर्शवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले आहे, तरीही १९ मार्चला प्रमोद सावंत आणि विश्वीजीत राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

pramod sawant, vishwajit rane
सहकारी सोसायटींना पोलीस आयुक्त पांडेंनी दिली पुन्हा ताकीद..गुन्हा दाखल करणार

सावंत -राणे यांच्यासोबतच्या बैठकीत गोव्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असे राणे यांनी सांगितले. केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर, एल. मुरगन, गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, महासचिव सी.टी.रवी हे देखील आज गोव्यात येणार होणार आहेत.

गोव्याच्या नवनिर्वाचीत भाजप आमदारांची आज दुपारी चार वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे अशी माहिती गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न विचारला असता तानावडे यांनी त्यावर थेट भाष्य करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाईल आणि हा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या पाठींब्याचं पत्र सादर केलं जाईल. यानंतर शपथविधीची तारीख निश्चीत होईल. २३ ते २५ मार्चमध्ये हा शपथविधी होऊ शकतो पण याची तारीख केंद्राचे प्रभारी ठरवतील, असे सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com