

BJP NDA Government : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून भाजपला मोठे यश मिळाले आहे. पाच पैकी तीन राज्यात भाजप सत्तेत आहे. यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळासह भाजपच्या संसदीय मंडळात फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात असून याआधी चार राज्यात नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची घोणषा करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पक्षासह सरकारमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्याच्या निवडणुका झाल्या असून भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यात घवघवीत यश मिळाले आहे. तामिळनाडूत थलपती विजयची सत्ता आली असून केरळ काँग्रेसकडे गेलं आहे. यानंतरच भाजपमध्ये पक्षपातळीवर आणि सरकारमध्ये १५ जूननंतर फेरबदलाची शक्यता वर्तवली जात होती.
त्याप्रमाणे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी दिल्लीसह पंजाब, हरियाणा आणि त्रिपुराच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. नबीन यांच्याकडून आता लवकरच राष्ट्रीयस्तरावरही पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत मिळत असून राष्ट्रीय स्तरावर पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
तसेच एनडीएच्या महिला आरक्षण धोरणावर जोर देण्यासाठी राज्यसभेत तसेच मंत्रिमंडळात महिला नेत्यांचे प्रतिनिधित्व विशेषतः वाढवण्यावर देखील भर देण्यात येणार आहे, असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात आहे. याच वृत्ताप्रमाणे पक्षाच्या संसदीय मंडळाची पुनर्रचना आणि सरकारमध्ये देखील खांदेपालट होण्याचे संकेत दिले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नबीन यांच्या घोषणेप्रमाणे दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी ६२ वर्षीय हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मल्होत्रा हे लोकसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. पंजाबची जबाबदारी ७६ वर्षीय केवल सिंग ढिल्लन यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपविण्यात आली आहे.
हरियाणाची जबाबदारी ८ वर्षीय अर्चना गुप्ता यांच्याकडे देण्यात आली आहे. तर ४४ वर्षीय अभिषेक देबरॉय यांना त्रिपुराचे प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. मल्होत्रा आणि गुप्ता हे अनुभवी असून त्यांचे संघटनात्मक पार्श्वभूमी मजबूत आहे. तर पंजाबमध्ये पुढील्या वर्षी होणाऱ्या विधानसभेची निवडणुकीची जोमाने तयारी करण्यासाठी ढिल्लन यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सरकारमध्येही मोठे बदल होण्याचे संकेत असून मोदी सरकार तिसऱ्या वर्षात प्रवेश करणार आहे. या स्थितीत पक्षातील काही नेत्यांची नाराजी दूर करण्यासह प्रशासनात नाविन्य आणण्यासाठी हा बदल केला जाईल. तर हा बदल अधिक मासाच्या समाप्तीनंतर (१५ जूननंतर) होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.