Fadnavis's Predictions On SC Verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत फडणवीसांनी केले भाकीत : ‘उद्धव ठाकरेंचे सरकार पुन्हा...’

Devendra Fadnavis News: सर्वोच्च न्यायालयातील निकालाचं माझं भाकीत मी आजच सांगून टाकतो.
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) कामकाज ज्यांनी बघितलं, त्यांच्या हे लक्षात आले असेल की, बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार परत येऊच शकत नाही. मी एक वकिल आहे. मला सांगा उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा रद्द करून सर्वोच्च न्यायालय त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आणून बसवणार आहे का? हे शक्यच नाही. सर्वोच्च न्यायालयात युक्तीवादादरम्यान त्यांच्या वकिलांकडून तीच मागणी करण्यात येत होती. पण, ते शक्य होणार नाही, असे भाकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis made predictions about the Supreme Court verdict)

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही दिवसांत येऊ शकतो. त्यामुळे भाजपकडून प्लॅन ए. बी. सी. डी असं सुरू असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्याबाबत विचारलं असता फडणवीसांनी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखली एकत्र लढू, असे स्पष्ट केले.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Karnataka Election : भाजपमध्ये असंतोषाचा भडका : उमेदवारीत डावलल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांसह पाच नेत्यांचा राजीनामा

भाजपला कोणताही प्लॅन तयार ठेवण्याचे कारणच नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे प्रोसेडिंग बघितलं. त्यांच्या हे लक्षात आले असेल की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी करण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार परत येऊच शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल फार काही पेक्युलेशन करणे योग्य नाही. कारण, ते आपलं अपेक्स कोर्ट आहे. आमची जी काही भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला ठामपणे असं वाटतंय की. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल हा योग्य पद्धतीने येईल. सर्वोच्च न्यायालयातील निकालाचं माझं भाकीत मी आजच सांगून टाकतो. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. हे सरकार स्थिर असून त्यात कोणताही बदल होणार नाही आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Nitin Deshmukh In Trouble: शिंदे फडणवीसांना भिडणारा ठाकरे गटाचा फायर ब्रँड नेता अडचणीत; कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल, 'हे' आहे कारण

राज्यपालांच्या भूमिकेबाबत खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीव्र भाषेत टिपण्णी केली आहे, या प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी उत्तर देणं टाळलं आहे. हे करत असताना मात्र, आमचं (शिंदे-फडणवीस) सरकार स्थिर आहे असेही स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, अदानी समूहाच्या चौकशीबाबत शरद पवार यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची स्वःताची भूमिका आहे. त्यांनी ती भूमिका आमच्या सांगण्यावरून जाहीर केलेली नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले. पण, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात बदल होतच असतो. मी ज्यावेळी बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्यासोबत चर्चा करत होतो, त्यावेळी ते आम्हाला कधीही सोडून जाणार नाहीत, असे वाटत हेाते. मात्र, त्यांनी भूमिका बदलली. (Latest Maharashtra News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com