
पणजी : गोवा विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेना नेते, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि गोव्याचे प्रभारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले, ''तुमच्या सगळ्या लोकांनी मोदींचा फोटो लावून लावून मतं मागितली. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेले. युतीमध्ये भाजपासोबत शिवसेना निवडून आली. भाजपाच्या स्टेजवर मोदींनी घोषणा केली भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची. त्याला तुम्ही समर्थन दिलं. राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,''
आदित्य ठाकरे म्हणाले, ''भाजपाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत,'' त्यावर फडणवीस म्हणाले, की ''याआधी भाजपा सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही. पण गोव्यानं प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारलं. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजपा लढतंय म्हणून ते लढले नाहीत? गेली २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. पण त्यांचं डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात” असा टोमणा फडणवीस यांनी लगावला.
''भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला,'' असे आदित्य ठाकरे म्हणाले.
''उत्तरप्रदेशात राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर शिवसेना २०० जागा लढले होते. एका जागेवर देखील डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. उलट मित्रपक्ष असूनही भाजपाला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत,'' असा आरोप फडणवीसांनी केला. देखील आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.