भाजप-आपमध्ये सापशिडीचा खेळ; केजरीवाल साप अन्...

दिल्लीमध्ये पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होणार आहे.
BJP distributed a modified version of 'snakes and ladders' board game.
BJP distributed a modified version of 'snakes and ladders' board game.

नवी दिल्ली : निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी, विरोधकांच्या विरोधात रान उठवण्यासाठी राजकीय नेते कोणत्या क्लुप्त्या लढवतील, हे सांगता येत नाही. दिल्लीमध्ये पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आप व भाजपने कंबर कसली आहे. भाजपने थेट सापशिडीच्या खेळातून आपवर निशाणा साधला आहे. या खेळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अन्य काही भाजप नेत्यांना साप बनवण्यात आलं आहे. तर भाजपच्या योजनांना शिडी दाखवण्यात आली आहे.

भाजपचा हा सापशिडीचा खेळ दिल्लीत चर्चेचा मुद्दा बनला आहे. दिल्लीतील झोपडपट्टी भागामध्ये भाजपकडून सापशिडीच्या खेळाचे बोर्डचे वाटप करण्यात आले आहे. झुग्गी सन्मान यात्रेअंतर्गत या भागातील मुलांना या खेळाचे वितरण केले आहे. या बोर्डवर दाखविण्यात आलेल्या सापांना केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राघव चढ्ढा व आतिशी सिंग यांचे चेहरे लावण्यात आले आहेत.

BJP distributed a modified version of 'snakes and ladders' board game.
रामायणावरील प्रश्नांची उत्तरं द्या अन् थेट विमानाने अयोध्येला जा!

तसेच बोर्डवरील बॉक्समध्ये डीटीसी घोटाळा, शिक्षण घोटाळा, रेशन घोटाळा, दिल्ली जल मंडळ घोटाळा आदींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच भाजप सरकारच्या काही योजनांचा उल्लेखही यावर करण्यात आला आहे. त्यामध्ये जनधन योजना, मुद्रा लोन योजना, स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ आदी योजनांचा समावेश आहे.

याविषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले, केजरीवाल यांनी झोपडपट्टीवासियांसाठी विविध योजनांचे आश्वासन दिले होते. पण त्याची पुर्तता झालेली नाही. या खेळामध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांना साप दाखवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप लावण्यात आले आहेत. केजरीवाल सरकारने दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना साप म्हणून दाखवण्यात काहीच आक्षेपार्ह नाही, असं गुप्ता यांनी सांगितलं.

BJP distributed a modified version of 'snakes and ladders' board game.
अखेर कॅप्टन जयंत जोशींचा मृतदेह सापडला; लष्कर अन् हवाई दलाला लागले 75 दिवस

महापालिका निवडणुकीच्या तयारीविषयी बोलताना गुप्ता म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सापशिडीचा खेळ सुरू करून तयारीची सुरूवात केली आहे. पण सत्य हे आहे की, हा खेळ आता फक्त लोकांच्या हातात आहे. दिल्लीत पुढील वर्षी महापालिकेच निवडणूक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com