Corruption Case : 14 वर्ष चालली केस, 219 साक्षीदार तपासले; भाजपच्या माजी मंत्र्याला शिक्षा, काय आहे प्रकरण?

BJP Ex-Minister Janardhan Reddy Sentenced to 7 Years : 007 से 2009 या काळात अनधिकृत खनन करत सरकारचे तब्बल 884 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप जनार्दन रेड्डी यांच्यावर होता.
BJP’s former minister Janardhan Reddy sentenced to 7 years for illegal iron ore mining involvement.
BJP’s former minister Janardhan Reddy sentenced to 7 years for illegal iron ore mining involvement.sarkarnama
Published on
Updated on

Janardhan Reddy News : तेलंगणातील हैद्राबादमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात 14 वर्षांपासून सुरू असलेल्या केसचा निकाल लागला आहे. बेकायदा लोहखनिज उत्खनन प्रकरणात कर्नाटकमधील भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी आणि तीन जणांना दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात तब्बल 219 साक्षीदार तपासत 3 हजार 336 दस्तावेज सादर करण्यात आले. कोर्टाने सर्व आरोपींना सात वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच 10 हजार रुपयांचा दंड ही लावला.

कोर्टाचा निर्णय येताच सीबीआयने जनार्दन रेड्डी आणि अन्य आरोपींना ताब्यात घेतले. जनार्दन रेड्डी यांच्यावर कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेवरील बेल्लारी राखीव वन विभागात खाण भाडेपट्ट्याच्या हद्दीत बेकायदेशीर खाणकाम केल्याचा आरोप होता.

BJP’s former minister Janardhan Reddy sentenced to 7 years for illegal iron ore mining involvement.
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; दिले मोठे संकेत...

कोर्टाने रेड्डी यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक ओएमसीचे मॅनेजर श्रीनिवास रेड्डी, तत्कालीन खाण आणि भूगर्भशास्त्राचे सहाय्यक संचालक व्ही. डी. राजगोपाल आणि रेड्डी यांचे सहाय्यक महफुज अली खान यांना देखील दोषी ठरवले. कोर्टाने माजी मंत्री सबिता इंद्र रेड्डी , माजी सरकारी कर्मचारी बी. कृपानंदम यांना निर्दोष मुक्त केले.

आरोपींवर 2007 से 2009 या काळात अनधिकृत खनन करत सरकारचे तब्बल 884 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप होता. या प्रकरणी तीन डिसेंबर 2011 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने पाच डिसेंबर 2011 को जनार्दन रेड्डी यांना अटक केली होती. साडेतीन वर्ष ते तुरुंगात होते. 20 जानेवारी 2015 मध्ये कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

स्वतंत्र पक्ष अन् पुन्हा भाजपात

जनार्दन रेड्डी हे भाजपचे माजी आमदार आणि मंत्री देखील होते. त्यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोड कल्याण राज्य प्रगती पक्षाची (केआरपीपी) स्थापना केली होती. मात्र 2024 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपला पक्ष भाजपमध्ये विलिन केला होता. तसेच ते पुन्हा भाजपमध्ये सामील झाले होते.

BJP’s former minister Janardhan Reddy sentenced to 7 years for illegal iron ore mining involvement.
Operation Sindoor : भारताच्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त, जाणून घ्या कुठे झाले हल्ले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com