
One Nation One Election in Rajya Sabha : राज्यसभेत सभागृह नेते आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी म्हटले की, काँग्रेसच्या आधीच्या आधीच्या सरकारद्वारे कलम ३५६चा वारंवार करण्यात आलेल्या दुरुपयोगाचा इतिहास बघता, सरकारने वन नेशन वन इलेक्शन आणण्याचा निर्णय घेतला आहे.
'भारतीय संविधानाची 75 वर्षांची गौरवशाली यात्रा' यावर राज्यसभेत होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी चर्चेला पुढे नेत, नड्डा यांनी काँग्रेसवर(Congress) संविधानाची भावना बदलण्याचा आणि ते पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला. त्यांनी प्रमुख विरोधी पक्षास भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काळा अध्याय म्हणून नोंद आणीबाणीस 50 वर्ष पूर्ण झाल्यावर या वर्षी 25 जून रोजी आयोजित होणाऱ्या संविधान हत्या दिवस कार्यक्रमात प्रायाश्चित म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले.
नड्डा(JP Nadda) म्हणाले की, आज तुम्ही वन नेशन वन इलेक्शनच्या विरोधात उभा आहेत. खरंतर तुमच्यामुळेच एक देश एक निवडणूक आणावं लागत आहे. कारण, 1952 ते 1967 पर्यंत देशात एकत्रच निवडणूक होत होती. तुम्ही(काँग्रेस) कलम 356च्या वापराने राज्यांनी निवडरलेली सरकारं वारंवार पाडली आणि असं करून तुम्ही अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकींची परिस्थिती आणून उभा केली.
भाजप(BJP) अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले की, काँग्रेसच्या सरकारांनी कलम 356 चा 90 वेळा वापर केला. त्यांनी म्हटले की, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आठवेळा, इंदिरा गांधी यांनी 50 वेळा, राजीव गांधी यांनी नऊ वेळा आणि मनमोहन सिंग यांनी दहावेळा कलम 356चा दुरुपयोग केला.
याशिवाय नड्डा यांनी हेही म्हटले की, संविधानाची 75 वर्षांची गौरवशाली यात्रा मध्ये या बाबींचाही उल्लेख झाला पाहिजे. जनतेला कळलं पाहिजे की, तुम्ही कशाप्रकारे निवडून दिलेलं सरकार एकदा नव्हे तर वारंवार पाडलं आणि देशाला संकटात ढकलण्याचं काम केलं. तसेच काँग्रेस सरकारांकडून करण्यात आलेल्या घटना दुरुस्तींचा उल्लेख करत नड्डा यांनी म्हटले की, देशाला कोणता धोका होता का, की तुम्ही देशावर आणीबाणी लादली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.