Mohan Bhagwat News : ''अहंकारास दूर ठेवा, नाहीतर खड्ड्यात पडाल; समाजातील सर्व वर्गांना मजबूत करणं गरजेचं''

RSS Mohan Bhagwat News : सरसंघचालक मोहन भागवत यांचं पुण्यातील कार्यक्रमात विधान!
Mohan Bhagwat
Mohan Bhagwat Sarkarnama
Published on
Updated on

Rashtriya Swayamsevak Sangh News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी म्हटले की, व्यक्तिने अहंकारापासून दूर राहीलं पाहीजे, नाहीतर तो खड्ड्यात पडू शकतो. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, देशाच्या विकासासाठी समाजातील सर्व वर्गांना मजबूत करणं आवश्यक आहे.

सरसंघचालक भागवत(Mohan Bhagwat) म्हणाले की, प्रत्येक व्यक्तिमध्ये एक सर्वशक्तिमान ईश्वर असतो, जो समाजाची सेवा करण्याची प्रेरणा देतो. परंतु अहंकारही असतो. राष्ट्राची प्रगती केवळ सेवेपुरती मर्यादित नाही. सेवेचा उद्देश नागरिकांना विकासात योगदान देण्यात सक्षम बनवणे असायला हवा.

समाजात सर्वकाही चुकीचं घडत आहे, हा समज वाढत चालला आहे. भागवत यांनी म्हटले की, सर्वांना वाटतं समाजात सर्वकाही चुकीचं घडत आहे. परंतु प्रत्येक नकारात्म पैलूसाठी समाजात 40 टक्के जास्त चांगली आणि उत्कृष्ट सेवा समाजात होत आहे. याबाबत लोकांना सांगणं आवश्यक आहे.

Mohan Bhagwat
Sanjay Singh : 'आप'चे संजय सिंह पुन्हा अडचणीत; आता तब्बल 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला!

लोकसंख्यावाढीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. हिंदू जोडप्याला किमान तीन मुले हवीत, असे त्यांनी म्हटले होते. त्यासाठी भागवतांनी लोकसंख्याशास्त्राचा हवाला दिला होता. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको, तसे झाल्यास समाज नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

Mohan Bhagwat
Mahayuti Government : धक्कातंत्र अंगलट; प्रचंड बहुमत, तरीही महायुती सरकार घामाघूम

नागपूर येथे आयोजित कठाले कुल संमेलनात बोलताना भागवत यांनी ही भूमिका मांडली होती. अनेक भाषा आणि समाज अशाचप्रकारे नष्ट झाल्याचे सांगत भागवत म्हणाले, साल 2000 च्या जवळपास भारतातील लोकसंख्येचे धोरण तयार करण्यात आले होते. देशातील लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com