Cabinet Expansion : गोगावले, शिरसाट, कडूंची आता तरी मंत्रिमंडळात वर्णी लागणार का ?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जबाबदारी देऊन भाजप-शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांची कसरत कमी करणार
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात बैठक झाली. या वेळी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. चौथ्या मंत्रिमंडळ विस्तारातून सत्ताधारी पक्षांतील नाराजांना समावून घेण्याची तयारी आहे. तसेच नव्याने मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्री पदांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता हा मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि कसा होणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

अजित पवार गट अचानक सत्तेत आल्यानंतर शिंदे गटातील काही आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यात आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आघाडीवर होते. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर आपल्याच सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. (Maharashtra Political News)

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : कुणी कितीबी करा रे हल्ला, माहूर-किनवटमध्ये 'या' पठ्ठ्याचाच मजबूत किल्ला!

सत्तेत तीन पक्ष सहभागी असले तरी अनेक जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी एकाच मंत्र्याकडे असल्याची चित्र आहे. याचा परिणाम संबंधित जिल्ह्यांकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे गटातील काही आमदारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री करण्यास विरोध केला होता. यामुळे राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्याला अद्यापही पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली नाही. आता झालेल्या बैठकीत या मंत्र्यांना काही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देऊन भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यावर चर्चा झाली आहे.

शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पहिल्या फळीत साथ देणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यानंतर राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेतल्यानेही भाजपसह शिंदे गटात नाराजी पसरली होती. तसेच तीव्र विरोध असूनही अजित पवारांना अर्थखाते दिले. परिणामी संबंधितांची नाराजी दूर करण्यासाठी पवारांनी मोठा विकासनिधी देऊ केला.

आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ पूर्ण करून सरकार नाराजांना दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार का, झाला तर त्यात काेणा-काेणाची वर्णी लागणार, तसेच कुठल्या जिल्ह्याचे काेणाला पालकमंत्रिपद मिळणार, याचीच सध्या चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Maratha Vs OBC : उपकाराची भाषा करत जरांगे पाटलांचे छगन भुजबळांना आवाहन; म्हणाले, 'ओबीसी नेत्यांनो परतफेड...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com