Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil, Chhagan BhujbalSarkarnama

Maratha Vs OBC : उपकाराची भाषा करत जरांगे पाटलांचे छगन भुजबळांना आवाहन; म्हणाले, 'ओबीसी नेत्यांनो परतफेड...'

Manoj Jarange Patil Appeals Chhagan Bhujbal : "मराठा आणि ओबीसीत दरी वाढवू नये"
Published on

Nanded Political News : 'गेल्या ७५ वर्षांपासून मराठा समजाने ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान, इज्जत वाढवली. आम्ही मराठ्यांनी तुमच्यावर उपकार केले. आमच्या बापजाद्यांनी तुमची प्रतिष्ठा वाढवली. आता उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली. आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा. आमचा बदला घेऊ नका,' असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांना सुनावले.

'भुजबळांनाही मराठ्यांनी मदत केली. आता आमच्यावर वेळ आली आहे म्हणून विरोध करू नका. तुम्ही आरक्षणासाठी सहकार्य करा, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल,' असेही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, जरांगेंनी मंत्री भुजबळांवर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. (Latest Political News)

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Ranajagjitsinha Patil News : ठाकरे पिता-पुत्राकडून ओमराजेंनी धडा घ्यावा; राणाजगजितसिंह पाटलांचा खोचक सल्ला

मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांतील लोकांशी चर्चा करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. नांदेड येथील सभेत त्यांनी या दौऱ्यात जिवाला धोका असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आल्याचे सांगितले. यावर ते म्हणाले, 'सरकार म्हणते मला धोका आहे, पण मला कोणाचा धोका नाही. मला जर धोका झाला, तर हा मराठा समाज संबंधितांना सोडणार नाही.'

जरांगे पाटील म्हणाले, 'मला मरायचे आणि जगायचे समाजासाठीच. येताना बायकोला सांगून आलो की मराठे क्षत्रीय आहेत. परत आलो तर तुझा, नाही तर समजाचा. कुंकू पुसून तयार राहा. मी पदासाठी किंवा राजकीय संबंध ठेवण्यासाठी आंदोलन करत नाही. मी समाजासाठी आंदोलन करतो', असेही स्पष्टीकरण जरांगेंनी या वेळी दिले.

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Shoumika Mahadik News : शौमिका महाडिकांच्या पोस्टरची कोल्हापुरात चर्चा; 'अब दिल्ली दूर नही...'

मनोज जरांगे पाटलांनी हिंगोली येथे भुजबळांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. यानंतर नांदेड येथील सभेत त्यांनी आता माननीय बोलतो, असे सांगून भुजबळसाहेब आरक्षण द्या, ओबीसी आणि मराठ्यात फूट पाडू नका, असे आवाहन केले.

यानंतर त्यांनी पोटजातीचा उल्लेख करून सरकारला कुणबी प्रमाणपत्राबाबत आठवण करून दिली. 'अनेक जातींमधल्या पोटजातींना आरक्षण दिले गेले आहे. त्याप्रमाणेच मराठा ही जात कुणबींची पोटजातीचा घटक होऊ शकणार नाही का? यासाठी कोणत्याही दस्तावेजाची गरज भासणार नाही. फक्त राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे, तीच आमच्याकडे मागील ७० वर्षांपासून नाही,' असे जरांगे म्हणाले. (Maharashtra Political News)

आतापर्यंत ज्यांनी आरक्षणाचे लाभ घेतले त्यांच्याकडून कसलेही पुरावे घेतले नाहीत. एका गावात एकाचा जरी पुरावा आढळून आला, तर संपूर्ण गावाला ओबीसी आरक्षण वा प्रमाणपत्र द्यावेच लागतील. सरकारमधील प्रतिनिधींनी सांगितले होते, आरक्षण मिळवण्यासाठी काही निकष आहेत, काही आधार लागतो, पुरावा मांडावा लागतो. आता पाच हजार पुरावे आढळून आले आहेत. मराठा समाजाचे सोने झाले आहे. यामुळे आता कसलीही बनवाबनवी न करता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, असे जरांगे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Pune Crime News : हिंजवडीतील कोट्यवधी रुपयांच्या मेडिकल प्रवेश फसवणुकीचं 'पुणे कनेक्शन'; अॅडमिशनची बोगसगिरीही उघड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com