Mamata Banerjee : ममतादीदींचे ‘खेला होबे’! शपथ घेण्याआधीच पाच खासदार देणार भाजपला धक्का?

Lok Sabha Election 2024 Result West Bengal BJP Trinamool Congress Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
Mamata Banerjee, PM Narendra Modi
Mamata Banerjee, PM Narendra ModiSarkarnama

West Bengal : सलद तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असले तरी त्यांची तिसरी टर्म तितकीशी सोपी असणार नाही. नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेऊन सरकार चालवावे लागणार आहे. पण त्याचवेळी पक्षातील खासदारांनाही सांभाळावे लागणार असल्याचे पश्चिम बंगालमधील हालचालींवरून समोर आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये 42 जागांपैकी भाजपला केवळ 12 जागा मिळाल्या आहेत. तर नेत्यांवर अनेक आरोप आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे असतानाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 29 जागांवर विजय मिळवला. पण एवढ्यावरच न थांबता ममतांनी आता भाजपला दुसरा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

भाजपच्या 12 खासदारांपैकी पाच खासदार तृणमूलच्या संपर्कात असल्याचे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ने दिले आहे. खासदारकीची शपथ घेण्याआधीच हे नेते भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात. रविवारी नरेंद्र मोदी आणि मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची वाट हे नेते पाहत आहेत. त्यांना स्थान न मिळाल्यास तृणमूलमध्ये उडी मारण्याची शक्यता आहे.

Mamata Banerjee, PM Narendra Modi
PM Narendra Modi : नेहरूंनंतर इंदिरा गांधी, वाजपेयींनी ‘हे’ करून दाखवलं! मोदींचा दावा काँग्रेसनं खोडून काढला

भाजपमधून खासदार आल्यास पोटनिवडणूक लढवून त्यांना पुन्हा निवडून आणण्याची चर्चाही तृणमूलमध्ये झाल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर पराभूत 30 उमेदवारांपैकीही अनेक जण मागील दाराने तृणमूल येण्यासाठी सज्ज असल्याचे वृत्त ‘टेलिग्राफ’ने पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, बंगालमधून पाच खासदार तृणमूलमध्ये गेल्यास भाजपचा आकडा 240 वरून 235 पर्यंत खाली येईल. त्यामुळे सरकारचे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यावरील अवलंबत्व आणखी वाढू शकतो. तर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसनंतर सर्वाधिक 37 जागा समाजवादी पक्षाला आणि 29 जागा तृणमूलला मिळाल्या आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com