Kangana Ranaut : उद्धव ठाकरेंशी 'पंगा' घेणाऱ्या कंगना रनौत लोकसभेच्या रिंगणात

BJP Lok Sabha Candidate List : कंगना रनौत यांना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : भाजपने लोकसभेची पाचवी यादी जाहीर केली आहे. यात 16 राज्यातील 92 उमेदवारांचा सहभाग आहे. या यादीत भाजपने राज्यातील महायुती सरकारवर टीका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कंगना रनौत यांना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. Kangana Ranaut

कंगना रनौत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कट्टर समर्थक आहेत. गेल्या वर्षी कंगना राणौत यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. भगवान कृष्णाने आशीर्वाद दिला तर आगामी लोकसभा निवडणूक लढवेल, असे त्यांनी म्हणत त्यांनी खासदार होण्याची इच्छ व्यक्त केली होती. आता भाजपने त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभेसाठी संधी दिली आहे.

Kangana Ranaut
Pratibha Dhanorkar : वडेट्टीवारांचा पत्ता कट; चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांचे नाव फायनल

दरम्यान, 2019 मध्ये भाजप-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र सत्ता स्थापन करताना शिवसेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. त्यास भाजपने नकार दिल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर अभिनेत्री कंगना रनौतने सडकून टीका केली होती. मुंबईत सुरक्षित वाटत नसून हा एक पाकिस्तानचा भाग असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.

Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024 : भाजपची पाचवी यादी जाहीर; सोलापूरमधून राम सातपुते तर भंडारा गोंदियामधून मेंढेंना संधी...

मुंबईबाबत केलेल्या विधानाचे पर्यावसन कंगना रनौतचे (Kangana Ranaut) घर पाडण्यापर्यंत गेले. तत्कालीन शिवसेना आणि रनौत याच्यांतील वाद देशभर गाजला होता. त्यावेळी रनौतला भाजपचे समर्थन होते. त्यावेळी रनौतने ठाकरेंना उद्देशून 'आज मेरा घर टुटा है कल तेरा घमंड टुटेगा' असे विधान केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत थेट उद्धव ठाकरे आणि शिवेसेनेला नडणाऱ्या कंगना यांना भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे.

मंडीचं लोकसभेचे काय गणित..

मंडी लोकसभा मतदारसंघा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथून काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह सलग सहा वेळा खासदार होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या सलग तीन वेळा खासदार आहेत. भाजपने आता काँग्रेसचा मंडी हा गड खालसा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच येथून अभिनेत्री कंगना रानौतला संधी दिल्याची चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024: सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम, बाळासाहेब थोरात म्हणाले; चर्चेतून प्रश्न मिटतील पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com