Lok Sabha Election 2024 : भाजपची पाचवी यादी जाहीर; सोलापूरमधून राम सातपुते तर भंडारा गोंदियामधून मेंढेंना संधी...

Ram Satpute Candidature Of Bjp : महाराष्ट्रातील तीन नावांचा समावेश आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नावांचा समावेश आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भंडारा-गोंदियामधून सुनील मेंढे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

92 उमेदवार जाहीर -

भाजपने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नावांचा समावेश आहे. एकूण 16 राज्यातील 92 उमेदवारांना संधी देण्याता आली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनौत यांनाही उमेदवारी दिली आहे.

वरुण गांधीचं तिकीट कापले -

या यादीत यूपी-बिहारसह इतर अनेक राज्यांतील उमेदवारांची नावे आहेत. भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगना राणौतला उमेदवारी दिली आहे, तर यूपीच्या पिलीभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले नवीन जिंदाल यांना हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Former IAS officer Debashish Sharma has been named the BJP candidate for the Nagaon Lok Sabha bypoll after joining the party days after his voluntary retirement.
Pune voter-list revision under SIR reportedly sees 45% of voter names excluded, raising questions over booth-level political preparedness.
Raosaheb Danve
Top-10-News 2
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com