BJP VS Congress : भाजपच्या उत्पन्नात वाढ, तर काँग्रेसला फटका; कुणाला किती मिळाला निधी?

Electoral Bonds : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला मिळणाऱ्या रक्कम वाढली
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : सत्ताधारी भाजपला 2022-23 या वर्षात निवडणूक रोख्यांद्वारे तब्बल 1300 कोटी रुपये मिळाले आहेत. तर काँग्रेसच्या निधीत मोठी घट झाली आहे. भाजपला काँग्रेसपेक्षा सात पट जास्त निधी मिळाला आहे. या आर्थिक वर्षात भाजपला एकूण 2120 कोटी रुपयांची देणगी मिळाली. त्यातील तब्बल 61 टक्के रक्कम फक्त निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जामा झाल्याचे समोर आले आहे.

भाजपने निवडणूक आयोगाला (Election Commission) 2023-23 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला. या अहवालात भाजपला एकूण मिळालेल्या एकूण निधीत निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून मिळालेल्या देणग्या आणि खर्चाचा तपशील आहे. या अहवालानुसारच भाजपला 2023-23 मध्ये दोन हजार 120 कोटी रुपयांची देणगी मिळाली असून त्यात तब्बल 61 टक्के निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या निधीचा असल्याचे समोर आले आहे.

BJP, Congress
Amruta Fadnavis : गृहमंत्र्यांची पाठराखण, निखिल वागळेंना मोलाचा सल्ला; अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

दरम्यान, या अहवालातून भाजपला (BJP) वर्षी मिळणाऱ्या रकमेत वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचेही दिसून येते. 2021-22 या आर्थिक वर्षात भाजपला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण 1775 कोटी देणगी मिळाली होती. तर एकूण उत्पन्न 1917 कोटी होते. त्यानंतर 2022-23 मध्ये पक्षाचे एकूण उत्पन्न 2360.8 कोटी झाले होते.

दुसरीकडे, काँग्रेसने (Congress) निवडणूक रोख्यांमधून 171 कोटी निधी मिळाला. दरम्यान, 2021-22 च्या आर्थिक वर्षात काँग्रेसला 236 कोटी मिळाले होते. यावरून काँग्रेसच्या निधीत घट झाल्याचे पाहायला मिळते.

BJP, Congress
Deepak Kesarkar News : 'आपण किती खोके घेतो याचा विचार करावा, दुसऱ्याला..' ; केसरकरांचा ठाकरेंवर निशाणा!

यंदा मोठी बचत

भाजपने गेल्या आर्थिक वर्षात व्याजातून 237 कोटी कमावले, तर ही रक्कम 2021-22 मध्ये 135 कोटी होती. मिळालेल्या रकमेतून भाजपने निवडणूक आणि सामान्य प्रचारावरील एकूण खर्चापैकी, विमान आणि हेलिकॉप्टरसाठी 78.2 कोटी वापरले. तर 2021-22 हीच रक्कम 117.4 कोटी होती. येथे भाजपने मोठी बचत केल्याचे दिसून येते.

उमेदवारांना देण्यात येणाऱ्या सहाय्य निधीतही भाजपने मोठी कपात केल्याचे समोर आले आहे. २०२२-२३ या वर्षात पक्षाने उमेदवारांना 76.5 कोटी आर्थिक सहाय्य म्हणून दिले. तर 2021-22 मध्ये हाच आकडा 146.4 कोटी होता. या मदतीचा तपशील भाजपने देयके या मुद्द्याखाली मांडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इतर पक्षांची स्थिती

समाजवादी पक्ष - 2021-22 मध्ये निवडणूक रोख्यांद्वारे 3.2 कोटी रुपयांचा निधी मिळाला. तर 2022-23 मध्ये, या रोख्यांमधून कोणतेही निधी समाजवादी पक्षास मिळाला नाही.

तेलंगू देशम पार्टी - टीडीपीला 2022-23 मध्ये निवडणूक रोख्यांद्वारे 34 कोटी मिळाले. ही रक्कम पक्षाला मिळालेल्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 पटीने जास्त आहे.

(Edited by Sunil Dhumal)

BJP, Congress
Rajya Sabha Election : महाविकास आघाडी उमेदवार उतरवणार? राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण रंगणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com