Amruta Fadnavis : गृहमंत्र्यांची पाठराखण, निखिल वागळेंना मोलाचा सल्ला; अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

Devendra Fadnavis, Nikhil Wagle : गोळीबारांनंतर पुण्यातील हल्ल्याच्या घटनेने राज्यातील वातावरण तापले
Amruta Fadnavis
Amruta FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्यात गोळीबारांच्या घटनांनी राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचा आरोप करून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. यातच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवरही पुण्यात हल्ला झाला. यावरूनही सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. अशा वातावरणात अमृता फडणवीस पती देवेंद्र यांच्या मदतीला धावल्या. तसेच वागळेंनाही त्यांनी मोलाचा सल्ला दिला. तर भाजप कार्यकर्त्यांचे कानही टोचले.

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad), दहिसरमध्ये मॉरिस नरोन्हा, जळगावमधील चाळीसगाव येथील गोळीबारांनी राज्य हदरून गेले आहे. यावरून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यातील कायदा सुव्यस्था राखण्यास सक्षम आहेत. त्यासाठी ते योग्य पावले उचण्यास तत्पर आहेत. राज्यातील शांतता आबादित राखण्यासाठी ते सर्व काही गोष्टी करतील, असे म्हणत त्यांनी पत्नी म्हणून फडणवीसांची पाठराखण केली.

Amruta Fadnavis
Ashok Chavan : वंचितमुळे काँग्रेसची चिंता मिटली; पण पारंपारिक 'वोट बँक' राखण्याचे मोठे आव्हान

यानंतर अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) आपला मोर्चा निखिल वागळेंकडे वळवला. वागळेंवर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. याबाबत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही दोन शब्द सुनावले आहेत.

अमृता फडणवीस म्हणाल्या, निखिल वागळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप दुरुपयोग करतात. त्यातूनच त्यांच्यावर यापूर्वीही अनेकदा हल्ले झालेले आहेत. आता वागळेंनी मर्यादित राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

भाजपचे कार्यकर्त्यांनीही त्यांच्या अधिकारांची दुरुपयोग केला आहे. त्यांनी आता आक्रमक होऊ नये. हे प्रकरण दोन्ही बाजूने लवकर संपायला हवे, असेही अमृता फडणवीसांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होता आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक मंत्रालयात रिल्स काढून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशतीचा प्रयत्न केला जातो. यावरून पुणे, नागपूर पोलिसांनी गुंडांची हजेरी घेतली. त्यातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात पत्रकार वागळेंची गाडी फोडली. या प्रकरणातील दहा आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amruta Fadnavis
Bharat Ratna Award : निवडणुकांच्या तोंडावर 'भारतरत्न'; रोहित पवारांचा अजितदादांसह मुख्यमंत्र्यांना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com