Nitin Gadkari : ...तर 2027 मध्ये पुन्हा भाजप सरकार? गडकरींनी CM सावंतांना दिले महत्वाचे काम !

Goa Assembly Election : गोव्यात अभूतपूर्व काम झालं आहे. पण येणारा दोन वर्षांचा काळ आपल्यासाठी कठीण परिक्षेचा आहे. आपल्याला या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पुन्हा एकदा गोव्यातील जनतेची सेवा करायची आहे..
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Goa News : गोव्यात 2027 मध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. गोव्यात पुन्हा एकदा भारतीय पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 15 वर्षात गोव्यात अभूतपूर्व काम झाले आहे. याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आपण गोव्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गोव्यासाठी विकासकामांच्या अनेक घोषणा केल्या. आपल्या भाषणात गडकरी म्हणाले, गोव्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचे असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. विकासकामांचा अजेंडा जनतेसमोर मांडावा लागेल. त्याचबरोबर जनतेसाठी आपलं दायित्वही सिद्ध करावे लागले.

गेल्या 15 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने गोव्यात अभूतपूर्व काम झालं आहे. पण येणारा दोन वर्षांचा काळ आपल्यासाठी कठीण परिक्षेचा आहे. आपल्याला या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पुन्हा एकदा गोव्यातील जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे आतापासूनच आपण कामाला लागले पाहिजे.

Union Minister Nitin Gadkari
Jagan Mohan Reddy : आमदार RRR यांच्या खूनाचा प्रयत्न; चंद्राबाबूंचा जगनमोहन यांच्यावर पहिला वार...

गडकरी पुढे मुख्यमंत्र्यांना सूचना करत म्हणाले की, गेल्या 15 वर्षातील गोव्यासाठीच्या व्हिजनचा अभ्यास आपण पुन्हा एकदा केला पाहिजे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपल्याला कोणती कामे करावी लागतील याचाही विचार केला पाहिजे. याशिवाय,निवडणुकीपूर्वीच्या (Election) दोन वर्षांमध्ये आपण एक सर्व्हे केला पाहिजे, ज्यामध्ये जनतेच्या मनामध्ये आपण काय चांगलं केलं ते शोधून काढले पाहिजे. या साऱ्या काळात जनतेची नाराजी कोणत्या कारणांसाठी आहे हेही शोधले पाहिजे.

Union Minister Nitin Gadkari
Rahul Gandhi News : स्मृती इराणींबाबत अपमानस्पद टिप्पणी करणाऱ्यांना राहुल गांधींची 'Warning', म्हणाले..

जे आपल्या समर्थनार्थ आहेत त्यांचा विश्वास मजबूत करुन जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करुन त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादित केला पाहिजे. हे केलं तर नक्की 2027 मध्ये पुन्हा एकदा गोव्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल.गडकरी पुढे संघटनेबाबत बोलताना म्हणाले की, गोव्यात आपली संघटना मजबूत आहे. पण आता ही संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण आपली संघटना आणखी कशी मजबूत करु शकतो हेही पाहिजे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com