Jagan Mohan Reddy : आमदार RRR यांच्या खूनाचा प्रयत्न; चंद्राबाबूंचा जगनमोहन यांच्यावर पहिला वार...

Chandrababu Naidu K Raghurama Krishnam Raju TDP : टीडीपीचे आमदार रघुराम कृष्णम राजू यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Chandrababu Naidu, Jaganmohan Reddy
Chandrababu Naidu, Jaganmohan ReddySarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी चांगलेच अडचणीत आले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर पहिला राजकीय वार केल्याचे मानले जात आहे. नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाच्या आमदाराच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा रेड्डी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

टीडीपीचे आमदार के. रघुराम कृष्णम राजू (RRR) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुंटूर जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेड्डी यांच्यासह माजी पोलिस महासंचालक, माजी अतिरिक्त पोलिस अधिक्षक, गुंटूर शासकीय रुग्णालयाच्या माजी अधिक्षकांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. के रघुराम यांना आरआरआर म्हणूनही ओळखले जाते.

Chandrababu Naidu, Jaganmohan Reddy
Constitution of India : संविधानाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; काँग्रेसला गाठलं खिंडीत...

आमदार आरआरआर यांनी आपल्या खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच जेलमध्ये छळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जगन मोहन रेड्डी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी मिळून आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा आमदारांनी केला आहे.    

रघुराम कृष्णम राजू यांना मे 2021 मध्ये सीआयडीने अटक केली होती. त्यावेळी जगनमोहन हे मुख्यमंत्री होते. तर आरआरआर हे त्यावेळी खासदार होते. अटक केल्यानंतर हैद्राबाद येथील स्थानिक कोर्टात हजर न करता गुंटूरला नेण्यात आल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Chandrababu Naidu, Jaganmohan Reddy
Kangana Ranaut : आधार कार्डशिवाय भेटणार नाही; खासदार कंगनाचा अजब फतवा

सीआयडीचे अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्याला बेस्ट आणि काठ्यांनी मारले. हृदयाशी संबंधित औषधे घेण्यासही परवानगी देण्यात आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सुचनेनुसार हे सुरू होते, असा आरोप आमदार आरआरआर यांनी केला आहे.

पोलिसांनी आपला जीव घेण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मोबाईल काढून घेतला. त्याचा पासवर्ड देईपर्यंत छळ करण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीमुळे जगनमोहन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात आंध्र प्रदेशातील राजकारण चांगलंच तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com