UP BJP District President: लोकसभेसाठी भाजपची नवी रणनीती; ७१ पदाधिकाऱ्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Uttar Pradesh BJP : लोकसभेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील भाजपमध्ये संघटनात्मक बदल
UP BJP
UP BJP Sarkarnama

Uttar Pradesh News: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच दिग्गज नेते कामाला लागले असून, त्यांनी बैठकींचा धडाका सुरू केला आहे. एकीकडे 'एनडीए' आणि दुसरीकडे 'इंडिया आघाडी'च्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली आहे.

लोकसभेच्या दृष्टीने भाजपने उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केले असून, उत्तर प्रदेशातील भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्यावर भर दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप आता नव्या पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी देत असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाला बळकटी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

UP BJP
Nashik BJP Politics : नाशिक भाजपमधील घराणेशाहीचा वाद चव्हाट्यावर; थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, नेमका काय प्रकार?

उत्तर प्रदेशातील ९८ पैकी ७१ जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्या जिल्हाध्यक्षांवर आगामी निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. जिल्हा पातळीवरच नाही तर राज्य पातळीवरदेखील पक्षांतर्गत मोठे बदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

एवढंच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील भाजपच्या एक चतुर्थांश विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात येणार नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या या निर्णयाचा पक्षाला फायदा होणार की तोटा, हे मात्र येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे.

UP BJP
Raju Shetti Warning : हिंमत असेल तर राज्याबाहेर जाणारा ऊस आडवून दाखवा; राजू शेट्टींचे सरकारला चॅलेंज

भाजपचे राज्यातील एक चतुर्थांश विद्यमान खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट न देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचादेखील समावेश आहे. यामध्ये बहुतांश नेते पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशमधील असल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा ज्या १६ लोकसभा मतदारसंघांत पराभव झाला होता, त्या मतदारसंघांतील १५ युनिट्सपैकी १४ युनिट्सचे जिल्हाध्यक्ष भाजपने बदलले आहेत.

उत्तर प्रदेशमधील एकूण ९८ नव्या संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची यादी भाजपने १५ सप्टेंबरला जाहीर केली. एकूण सहा प्रदेशातील विद्यमान जिल्हाध्यक्षांना बदलण्यात आले. भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १७, कानपूर प्रदेशात १३, ब्रज, काशी, अवध या प्रदेशांत प्रत्येकी १०, गोरखपूरमध्ये नऊ नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली.

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एकूण १४ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे सत्ता हवी असेल तर भाजपला येथे चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाचे संघटनात्मक बदल केले आहेत.

Edited by - Ganesh Thombare

UP BJP
Navneet Rana and Ravi Rana: हनुमान चालीसा पठण प्रकरण : कोर्टाने फटकारल्यानंतरही राणा दाम्पत्याची सुनावणीला दांडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com