Navneet Rana and Ravi Rana: हनुमान चालीसा पठण प्रकरण : कोर्टाने फटकारल्यानंतरही राणा दाम्पत्याची सुनावणीला दांडी

Amravati : हनुमान चालीसा पठण प्रकरणाच्या सुनावणीला राणा दाम्पत्याची दांडी; आता 'या' दिवशी होणार फैसला
Navneet Rana and Ravi Rana
Navneet Rana and Ravi RanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच राणा दाम्पत्याला शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आजही राणा दाम्पत्यानी सुनावणीला दांडी मारली.

नवनीत राणा आणि रवी राणा हे याआधीही अनेकदा सुनावणीदरम्यान गैरहजर राहिले होते. त्यावर न्यायालयाने आक्षेप घेत राणा दाम्पत्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. तसेच न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नाही, अशा कडक शब्दात त्यांना झापलं होतं. त्यानंतर आजच्या सुनावणीला राणा दाम्पत्य हजर राहण्याची शक्यता होती.

Navneet Rana and Ravi Rana
Ganesh Sugar Factory : 'श्रीगणेश'च्या वाटेत विखे पाटलांचे काटे ! संचालक मंडळाच्या पत्रातून गंभीर आरोप

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. त्यावेळी झालेल्या सुनावणीवेळी सलग दोन वेळा राणा दाम्पत्य न्यायालयात गैरहजर राहिलं.

गेल्या सुनावणीवेळी यावरूनच न्यायालयाने राणा दाम्पत्यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीला राणा दाम्पत्य हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आजही राणा दाम्पत्यानी दांडी मारली.

हनुमान चालीसा पठण प्रकरणी आता पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला पार पडणार असून, येत्या सुनावणीला तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited by - Ganesh Thombare

Navneet Rana and Ravi Rana
Ganesh Festival 2023: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठं गिफ्ट; शिंदे सरकारने घेतला 'हा' निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com