Sanjay Raut On Ajit Pawar : राज्याच्या तिजोरीची लूट चोक्सी, मल्ल्यासारखीच; सजंय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा

Uddhav Thackeray Vs BJP : सोबत आलेल्या आमदारांना शेकडो कोटी इतरांना फुटकी कवडीही नाही
Ajit Pawar, Sanjay raut
Ajit Pawar, Sanjay rautSarkarnama

Mumbai Political News : 'विकास करायचा असेल तर सत्ता आवश्यक असते. यामुळे आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत', असे उपमुख्यमंत्री अजित पवार बंड केल्यानंतर वारंवार सांगत आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सडकून टीका करत अजितदादांचा चांगलाच समाचार घेतला.

'सोबत आलेल्यांना शेकडो कोटींचा निधी आणि विरोधातील आमदारांना फुटकी कवडीही नाही, हीच का तुमची विकासाची व्याख्या? राज्याच्या तिजोरीची लूट सुरू आहे', असा घणाघात राऊतांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केला आहे. राऊतांनी जिव्हारी लागणारे शब्द वापरल्याने भाजपसह अजित पवार गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Ajit Pawar, Sanjay raut
BJP Plan For Lok Sabha : सोनिया गांधी, डिंपल यादवांनाही पराभूत करणार; १६० जागांसाठी भाजपचा काय आहे 'मास्टर प्लॅन' ?

राज्याची जबाबदारी असलेल्या सरकारने सर्व आमदारांना समान वागवणूक देणे गरजेचे असते. मात्र निधीवाटपात तसे दिसून आले नाही, असा आरोप राऊतांनी केला. ते म्हणाले, "तुम्ही राज्याचा विकास कारायचा म्हणता, पण विशिष्ट मतदारसंघाकडेच लक्ष देणे म्हणजे विकास असतो का? राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री निधी वाटप करताना दुजाभाव करतात. जे आपल्या गटासोबत आलेले आहेत त्यांना शंभर कोटी आणि इतरांना फुटकी कवडीही नाही. आमच्यासोबत आलेल्यांच्याच मतदारसंघाचा विकास होणार इतरांचा नाही. ही विकासाची कुठली व्याख्या आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (Ajit Pawar) अजित पवारांनी सांगावे," असे आव्हानही राऊतांनी केले आहे.

Ajit Pawar, Sanjay raut
NCP News : योगेश ससाणेंनी दोन पत्त्यांचा गेम खेळला ; हातात दहा हुकमी एक्के ठेवले ; राष्ट्रवादीलाच ‘कन्फ्यूज’ केले...

राज्याची तिजोरी मिळून लुटली जात असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. या लुटीची तुलना त्यांनी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यांशी केल्याने सत्ताधारी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. "राज्यात हजारो कोटी रुपयांच्या निधीची सर्रासपणे लूट सुरू आहे. या लूट मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने केलेल्या लुटीसारखीच आहे. त्यांनी बँकांना लुटले तरी ही मंडळी राज्याच्या तिजोरीला लुटत आहेत", असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Ajit Pawar, Sanjay raut
Chandrashekhar Bawankule News : भाग पाडलं तर कायदा हातात घेऊ, अन् मुंबईत 'ईट का जवाब पत्थर से...' देऊ !

शिवसेना फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपने राज्यात सत्तांतर केले. यानंतर वर्षातच राष्ट्रवादी फुटून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आता मात्र २०२४ ला सत्तांतर होणार असल्याचा दावा करत राऊतांनी फुटीरांना खोचक प्रश्व विचारला आहे. राऊत म्हणाले, देशात आणि राज्यात २०२४ ला सत्ता परिवर्तन होणार आहे. त्यावेळी तु्म्ही कुठल्या पक्षात उड्या मारणार हे आताच सांगून टाका." राऊतांनी केलेल्या या टीकेनंतर सत्ताधारी काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com