Mahua Moitra News : निवडणूक निकालाआधी महुआ मोईत्रा जेलमध्ये जाणार?

Lok Sabha Election 2024 : महुआ मोईत्रा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही महिन्यांपुर्वीच ‘पैशांच्या बदल्यात प्रश्न’ या प्रकरणात त्यांची खासदारकी गेली होती.
Mahua Moitra, Agnimitra Paul
Mahua Moitra, Agnimitra PaulSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra News) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याने केलेल्या दाव्यानुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच त्यांना जेलमध्ये जावे लागेल. या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सध्या सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.   

भाजपच्या (BJP) नेत्या अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांनी महुआंना अटक होईल, असा दावा केला आहे. त्यांना भाजपने मेदिनीपूर लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो, हरलो किंवा जिंकलो तरी त्याआधी महुआ मोईत्रांनी जे केले आहे, त्यासाठी तुरूंगात जावे लागेल. त्यांनी संसदेत (Parliament) प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतीकडून पैसे घेतले.

Mahua Moitra, Agnimitra Paul
Arvind Kejriwal News : केजरीवालांनी आपल्याच दोन मंत्र्यांना आणलं अडचणीत? ‘ईडी’चा कोर्टात मोठा दावा

महुआ या तृणमूल काँग्रेसच्या कृष्णानगर मतदारसंघातील उमेदवार आहे. त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. याबाबत त्यांना चौकशीसाठी समन्सही पाठवण्यात आले आहे. तीनदा समन्स पाठवूनही त्या चौकशीला गेल्या नाहीत. निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या लाच घेऊन त्यानुसार संसदेत प्रश्न (Cash for Query Case) विचारल्याचा आरोप महुआंवर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संसदेच्या शिस्तपालन समितीच्या अहवालानंतर महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. आता त्या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच भाजप नेत्याच्या दाव्यामुळे आता महुआंना निवडणुकीच्या काळातच अटक होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

महुआंनी कारवाईविरोधात दिल्ली हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. पण दोन्ही ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला नाही. काही महिन्यांपुर्वी खासदारकी गेल्यानंतर आणि चौकशी सुरू असतानाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.

Mahua Moitra, Agnimitra Paul
Election Commission News : ईडी, आयटीच्या कारवाया अन् निवडणूक आयोग; चार माजी आयुक्त रोखठोक बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com