

Jharkhand News: झारखंडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हत्तींच्या हल्ल्यामुळे होणारी जीवितहानी वाढल्याचं दिसून येत आहे. हत्तींकडून होत असलेले हे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कठोर सूचना दिल्याचंही समोर आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांत रामगढ, बोकारो, हजारीबाग, पश्चिम आणि पूर्व सिंहभूम, लोहरदगा, गुमला आणि दुमका यांसारख्या भागांमध्ये सुमारे 27 लोकांचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं सरकार आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता झारखंडमध्ये हत्तीच्या हल्ल्यात भाजपच्या युवा नेत्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात भाजपच्या बड्या नेत्याला जीव गमवावा लागला आहे. हत्तीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या भाजप नेत्याचं नाव अनुप कुमार पांडे असं आहे. त्यांच्यावर हत्तीनं शुक्रवारी (ता.10 एप्रिल 2026) हल्ला केला होता. याच हल्ल्यात पांडे यांचा मृत्यू झाला.
भाजपचे युवा नेते अनुप कुमार पांडे हे बुरहु पत्रा येथे नागरिकांना हत्तीबाबत सूचना देत जागरुकता निर्माण करत होते. याचदरम्यान, त्यांच्यावर हत्तीनं अचानक हल्ला केला.हत्तीचा हल्ला इतका भीषण होता. हत्तीनं पांडे यांना चिरडलं. वनविभागाने तात्काळ 25 हजारांची मदत जाहीर केली आहे
अनुप कुमार पांडे हे झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील घाघरा गावी वास्तव्याला होते. त्यांचा हत्तीनं पायाखाली चिरडून मृत्यू झाल्यानं स्थानिक भाजपवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनप्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.