ज्या `सागर` बंगल्यावर नाना पटोले काॅफी प्यायले तेथेच ते धडकणार होते पण...

महाराष्ट्रातील काॅंग्रेसने कोरोना पसरविल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ नाना पटोले (Nana Patole) आक्रमक
Nana Patol-Fadnavis
Nana Patol-Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : बघून घेऊ, गनिमी काव्याने येऊ, येऊन तर बघा, एकेकाला सोडणार नाही, अशी वक्तव्ये गेली 36 तास मुंबईत काॅंग्रेसच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या तोंडी होती. विरोधी नेत्यांच्या घरासमोर आंदोलनाचा नवीन ट्रेंड महाराष्ट्रात येऊ पाहत होता. पण तो मुंबई पोलिसांनी मोठ्या मिनतवारीने रोखला. नाहीतर काॅंग्रेस आणि भाजपमधील नवी राडा जनतेला पाहायला मिळाला असता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे शासकीय निवासस्थान असेलल्या सागर या बंगल्यासमोर हे आंदोलन होणार होते. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणे चुकीचे असल्याचा सल्ला राष्ट्रवादीने या निमित्ताने देत टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विधानावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये सोमवारीही मुंबईत रणकंदन झाले. मोदी यांनी माफी मागावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)) यांच्या बंगल्यापुढे आंदोलनाची तयारी केल्याने भाजप नेतेही आंदोलनकर्त्यांना उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षांच्या वादात आक्रमक झालेल्या पोलिसांनी काँग्रेस नेत्यांनी त्या-त्या भागांतच रोखले तर; फडणवीस यांच्या बंगल्याबाहेरील भाजपचे नेते, कार्यकर्त्यांना पांगविले. याचा सागर बंगल्यावर फडणवीस यांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना काॅफी पाजली होती. विधान परिषद आणि राज्यसभा या दोन निवडणुकांत काॅंग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून द्यावेत, यासाठी काॅंग्रेसचे नेते फडणविसांना भेटले होते.

'अखेर आज-उद्या फडणवीस यांचे घर गाठण्याचा इशारा देत, काँग्रेसने सोमवारचे आंदोलन स्थगित केले. तेव्हा काँग्रेस नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत भाजप नेत्यांनी आंदोलन हाणून पाडल्याचा आनंद व्यक्त केला.

Nana Patol-Fadnavis
Video: अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात


दरम्यान, वारकऱ्यांसमवेत फडणवीस यांच्या घराकडे निघालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पोलिस त्यांच्या घराबाहेर रोखले. तर भाजप नेत्यांनी आव्हान देऊनही पक्षाचे प्रवक्त अतुल लोंढे हे आंदोलनाच्या ठिकाणी आल्याने गोंधळ उडाला, तेव्हा पोलिसांनी लोंढे यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, पोलिस बंदोबस्त असूनही आंदोलन हाणून पाडण्यासाठी जमलेल्या भाजप नेते, कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाला. त्यामुळे काँग्रेसचा इशारा आणि भाजप नेत्यांची उत्तराची तयारी राहिल्याने मलबार हिल परिसरात राजकीय शिमगा पाहायला मिळाला. काही भागांत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरोसमोर आल्याने घोषणाबाजीचे युध्द रंगले.

Nana Patol-Fadnavis
video : सरकारने दबावतंत्राचा वापर केला होता - प्रसाद लाड

महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याच्या मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस नेत्यांनी राज्यभरातील भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन केले. त्यात मुंबईत फडणवीस यांच्या सागर बंगल्यापुढच्या आंदोलनासाठी प्रदेश आणि मुंबई काँग्रेस तयारी केली होती. परंतु, हे आंदोलन हाणून पाडण्याचा इशारा भाजप नेते, कार्यकर्त्यांनी दिला होता. दरम्यान, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याच्या शक्यतेने चोख पोलिस बंदोबस्त होता. तरीही, काँग्रेस, भाजप आपापल्या भूमिकांवर होते. त्यातूनच मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सकाळीच सागर बंगल्यावर पोचले. या भागात गर्दी होत असतानाच भाजपविरोधी घोषणा देत बंगल्याबाहेर आलेले काँग्रेसचे लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पटोले, जगताप हेही कार्यकर्तेसमवेत आंदोलनासाठी निघाले असतानाच बंगल्याच्या परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. खबरदारी म्हणून पटोले यांना त्यांच्या बंगल्याबाहेर तर जगताप यांना रस्त्यातच पोलिसांनी रोखले. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे नियोजित आंदोलन स्थगित झाले.

Nana Patol-Fadnavis
तुमच्या नाकावर टिच्चून 'सागर' बंगल्यावर येऊन गेलो: लोंढेंनी लाडांना डिवचले

काँग्रेसला धडा शिकविण्याचा इशारा देत, फडणवीस यांच्या बंगल्याच्या परिसरात जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखताना कार्यकर्ते-पोलिसांत वादाच्या घटना घडल्या. भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने महिला पोलिसाला चावा घेतल्याचा प्रकार घडला. त्याबाबत पोलिसांनी तक्रार केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्यानंतर लोंढे यांनी भाजप नेत्यांवर विशेषत: आमदार प्रसाद लाड यांना डिवचले. ‘लाड तुम्ही दिलेले आव्हान स्वीकारून मी आंदोलनाच्या ठिकाणी आलो आणि जिवंत परतही आलो,' असे सांगून लोंढे आंदोलन केल्याचा दावा केला. जेव्हा आलो तेव्हा पोलिसांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला; पण महाराष्ट्राचा द्वेष करण्याचा निषेध करून परत आलो. तिथे लाड तुम्ही कुठे दिसला नाही, असा खोचक सवालही लोंढे यांनी विचारला. आंदोलनासाठी आलेले परत परत जाणार नसल्याचा इशारा लाड यांनी दिला होता.

राष्ट्रवादीचा काॅंग्रेसला टोमणा

आज काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भूमिका योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नसून असा पायंडा पडला नाही पाहीजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. नवाब मलिक यांनी मांडली.

आपली भूमिका मांडताना नवाब मलिक म्हणाले की, नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करत असताना दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर उतरतात. लोकशाहीमध्ये विरोधाचा अधिकार असताना सरकार किंवा न्यायालयाने निश्चित करुन दिलेल्या जागेवरच निदर्शने करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. त्यामुळे कोणत्याही राजयकी पक्षाने इतर पक्षांच्या नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारणे योग्य होणार नाही. प्रत्येक पक्षाने याबाबत विचार करावा, अशी आमची भूमिका आहे. अशा आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येतो आणि त्यातून वेगळी परिस्थिती उद्भवते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने बैठक घेऊन याबाबत ठोस निर्णय घेतला पाहीजे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com