Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

राज ठाकरेंना 'त्या' नगरसेवकाला धडा शिकवायचाय! म्हणूनच...

मनसेच्या (MNS) ७ पैकी ६ नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता. त्यापैकी एक परमेश्वर कदम हे देखील होते.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) घाटकोपरमधील कामराज नगर इथल्या शाखेच्या उद्घाटनाला जाणार आहेत. ही शाखा मनसेत (MNS) वर्षभरापूर्वी प्रवेश करणाऱ्या संतोष पिंगळे (Santosh Pingle) यांची आहे. पिंगळे हे पूर्वी मनसेत होते, त्यांनी मधल्या काळात भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. पण वर्षभरापूर्वी त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत संतोष पिंगळे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना साडे तीन हजार मते मिळाली होती. पण मनसेत आता त्यांनी प्रवेश केल्यानंतर या यावेळी मनसेकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित आहे.

Raj Thackeray
हिंदुहृदयसम्राट म्हणून लागले राज ठाकरेंचे बॅनर

एका कार्यकर्त्याच्या किंवा नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या साध्या शाखेच्या उदघाटनाला राज ठाकरे स्वतः येणार असल्यामुळे या उदघाटनाची चर्चा अधिक आहे. ठाकरे स्वतः येण्याचे कारणही तसेच आहे. कारण या एका प्रभागाची निवडणूक मनसेने स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या प्रभागात सध्या शिवसेनेचे परमेश्वर कदम हे नगरसेवक आहेत. कदम हे २०१२ साली मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते, मात्र, २०१४-१५ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१७ साली पुन्हा एकदा त्यांनी मनसेत प्रवेश करून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि निवडून आले. मात्र, यावेळी देखील मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापैकी एक कदम हे देखील होते.

त्यामुळे दोनदा पक्षातून उमेदवारी देऊनही कदम शिवसेनेत गेल्याने ही बाब मनसे अध्यक्षांच्या जिवारी लागली आहे. त्यामुळे यावेळी काहीही करून या जागेवर मनसेचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी मनसे आपला जोर लावणार आहे. ही निवडणूक मनसेने आपल्या स्वाभिमानासाठी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच खुद्द राज ठाकरे इथल्या एका कार्यकर्त्यांच्या शाखेच्या उद्घाटनासाठी जात आहेत.

Raj Thackeray
शिवसेना खासदाराला कोर्टाचा दणका; 1 वर्षाचा तुरुंगवास अन् पावणेदोन कोटीचा दंड!

दरम्यान, ठाकरे यांच्या स्वागतासाठी घाटकोपर येथे लावण्यात आलेल्या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. लावण्यात आलेल्या बॅनरवर राज ठाकरेंचा उल्लेख हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे, असा केला आहे. यामुळे आज दिवसभरांपासून यावर सोशल मिडियात जोरदार चर्चा रंगत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com