Gyandev Ahuja : गोहत्या झाली म्हणून वायनाडमध्ये भूस्खलन, भाजप नेत्याचा अजब दावा

Bjp leader Gyandev Ahuja Wayanad landslides : उत्तरखंड आणि हिमाचलच्या तुलनेत केरळमध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनात मृतांची संख्या देखील जास्त असल्याचे ज्ञानदेव आहुजा यांनी म्हटले आहे.
Gyandev Ahuja
Gyandev Ahuja sarkarnama
Published on
Updated on

Gyandev Ahuja News : केरळमध्ये भूस्खलन होऊन तब्बल चार गावं गाठली गेली. यामध्ये 300 पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर 200 पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता आहेत. वायनाडमध्ये आलेल्या या संकटला गोहत्या कारणीभूत असल्याचा अजब दावा भाजप नेते ज्ञानदेव आहुजा यांनी केला आहे.

ज्ञानदेव आहुजा हे राजस्थानमधील भाजपचे माजी आमदार आहेत. केरळच्या भूमीवर गोमातेचे रक्त सांडले म्हणून वायनाडमध्ये हे मोठे संकट आल्याचे आहुजा म्हणाले.

ज्या भूमीवर गोमातेचे रक्त सांडेल तेथे तेथे संकट हे येणारच. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये देखील गोहत्या होतात.मात्र, तेथे भूस्खलन होण्याचे प्रमाण कमी आहे. कारण केरळच्या तुलनेत तेथे होणाऱ्या गोहत्या कमी आहेत, असा तर्क देखील भाजप नेते ज्ञानदेव आहुजा यांनी लावला आहे.

Gyandev Ahuja
Ayodhya Rape Case : बलात्कार पीडितेला रुग्णालयात धमकावले; मुख्यमंत्री योगींची सपा नेत्याविरोधात बुलडोझर कारवाई सुरू

उत्तरखंड आणि हिमाचलच्या तुलनेत केरळमध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनात मृतांची संख्या देखील जास्त असल्याचे आहुजा म्हणाले आहेत. तसेच 2018 पासून केरळमध्ये गोहत्य होत असल्याचा दावा आहुजा यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यासमोर गोहत्या झाल्याचा दावा देखील आहुजा यांनी केला आहे. राहुल गांधी हे वायनाडमध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. उत्तर प्रदेशातून रायबरेलीमधून देखील त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी वायनाडवरील जागेचा राजीनामा दिला आहे.

राहुल गांधीकडून पाहणी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नुकतीच वायनाडला भेट दिली. भूस्खलनग्रस्त लोकांसाठी उभारण्यात आलेल्या शिबिरामध्ये जात त्यांनी संकटग्रस्तांना दिलासा दिला. तसेच मदतकार्याचा आढावा घेतला.

Gyandev Ahuja
Uddhav Thackeray On Amit Shah: ठाकरेच ते..! अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन 'औरंगजेब फॅन क्लब'चे अध्यक्ष म्हटल्यावर थोडंच शांत बसणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com