BJP Leader Monu Kalyane : भर चौकात भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवरून आरोपी...

Monu Kalyane Death in firing : दुचाकीवरून पियूष आणि अर्जुन नावाचे दोन युवक चिमणबाग चौकात आले. दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने मोनूवर कल्याणे यांच्यावर गोळीबार केला.
Monu Kalyane
Monu Kalyanesarkarnama

BJP News : मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मोनू कल्याणे याची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मध्य प्रदेश सरकरामधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांमध्ये मोनू याचा समावेश होत होता.

दुचाकीवरून आलेल्या दोनजणांनी मोनूवर गोळीबार केला. जखमी मोनूला दवाखान्यात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोनूवर गोळीबार करणारे त्याचे शेजारी राहणारेच असल्याची माहिती आहे.

मोनू हा भाजपचा BJP पदाधिकारी होता. इंदूर विधानसभा क्रमांक 3 मध्ये सतत चर्चेत असलेले नाव होते. तो भगवा यात्रेची तयारी करत होता. मात्र, दुचाकीवरून आलेल्या पियूष आणि अर्जुन नावाचे दोन युवक चिमणबाग चौकात आले. तेव्हाच दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने मोनूवर गोळीबार करत तेथून पळ काढला.

Monu Kalyane
Video Suryakanta Patil : दोन दिवसांपूर्वी भाजपला रामराम, आज शरद पवार गटात प्रवेश? माजी केंद्रीय मंत्र्याचा मोठा निर्णय

कैलाश विजयवर्गीय Kailash vijayvargiya यांनी मोनूवर झालेल्या हल्ला हा त्याच्या शेजाऱ्याकंडून झाल्याचे मला माहिती मिळाल्याचे सांगितले. तसेच कौटुंबीक वादातून हा हल्ला झाली की आणखी कशामुळे याची माहिती आपल्याला नसल्याचे कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले. कैलाश विजयवर्गीय आणि त्यांचे पुत्र भाजपचे BJP माजी आमदार आकाश यांनी मोनू यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com