Shobha Karandlaje ON Imran Pratapgarhi : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. कार्यकर्ते, नेते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. अशा वातावरणात माफिया अतिक अहमद याची 'एन्ट्री'झाली आहे.
भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "इमरान प्रतापगढी हे अतिक अहमदला गुरु मानत होते," असा गंभीर आरोप करंदलाजे यांनी केला आहे.
कर्नाटकच्या उड्डपी-चिकमंगलूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार करंदलाजे म्हणाल्या, माफिया अतिक आणि अशरफ या दोघा माफीयांना इमरान हे आपला गुरु, मित्र, भाऊ मानत होते.
इमरान हे राज्यसभेचे खासदार आहेत, काही दिवसापूर्वी त्यांनी कर्नाटकमध्ये हिंदुच्या विरोधात भाषण केले होते. "मुस्लिम सर झुकाने वालों में नहीं बल्कि, सिर काटने वाले लोग हैं," असे इमरान म्हणाले होते.
इमरान आणि अतिक यांचे घनिष्ठसंबध होते. इमरान यांच्या शायरींच्या मैफलीत अतिक सहभागी असायचा. दोघेही गाणी म्हणायचे. इमरान यांना काँग्रेसने कर्नाटकमध्ये स्टार प्रचारक म्हणून उतरवले आहे. कॉग्रेसचा हात गुन्हेगारांच्या पाठिंशी आहे, असे करंदलाजे म्हणाल्या.
कर्नाटक विधानसभेची दहा मे रोजी निवडणूक आहे. १३ मे रोजी निकाल आहे. २२४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष यांना अरसीकेरे विधानसभचे तिकीट जेडीएसने दिले आहे. एनआर संतोष यांना गेल्या आठवड्यात भाजपने तिकीट नाकारले होते. संतोष हे येदियुरप्पा यांच्या बहीणीचे नातू आहेत.
येदियुरप्पाचे निकटवर्तीय म्हणून संतोष यांची ओळख आहे. काँग्रेसचे माजी आमदार अनिल लाड यांना बल्लारी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विविध कारणासाठी जेडीएसने बल्लारी शहर, मांड्या, वरुणा, राजाजीनगरसह बारा विधानसभा मतदार संघात १२ उमेदवार बदलले आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.