Arvind More Joins ShivSena: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; उपजिल्हाप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray News : शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली.
Arvind More joins Shiv Sena
Arvind More joins Shiv Sena Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात सत्तातर झाल्यानंतर ठाकरे गटाला लावलेली गळती थांबायचे नाव घेत नाही, कल्याण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत सहभागी होत आहे.

ठाकरे गटातील कल्याण उपजिल्हाप्रमुख , माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी आपल्या अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मोरे यांनी प्रवेश केला आहे.

Arvind More joins Shiv Sena
Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींना आज दिलासा मिळणार का ? : सुरत सत्र न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष...

मोरे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील प्रवेशामुळे कल्याण मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेच प्रवेश केल्यानंतर अरविंद मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मधील शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे सांगितले.

या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील, जयवंत भोईर, श्रेयस समेळ,छायाताई वाघमारे , संजय पाटील नेत्राताई उगले, मयूर पाटील, गोरख जाधव अंकुश जोगदंड, अभिषेक मोरे आदी उपस्थित होते.

Arvind More joins Shiv Sena
Maharashtra Government: सनदी अधिकाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; शेअर मार्केट गुंतवणुकीची..

यावेळी एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली. अरविंद मोरे यांच्या सोबतच माजी शिक्षण मंडळ सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष. डॉ. जितेंद्र भामरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस राजीव कपोते युवा सेनेचे विष्णू लोहकरे दिनेश निचीत,सुजय कदम यांनी पक्ष प्रवेश दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com