Jalgaon Sabha News: ठाकरेंच्या सभेपूर्वीच जळगावचं तापमान वाढलं ; गुलाबरावांनी घेतला राऊतांच्या भाषणाचा धसका; म्हणाले..

Uddhav Thackeray Jalgaon Sabha: चौकटीत राहून बोला.. अन्यथा मी सभेत घुसेल,"
Sanjay Raut & Gulabrao Patil Latest News
Sanjay Raut & Gulabrao Patil Latest NewsSarkarnama

Gulabrao Patil On Sanjay Raut: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 23 एप्रिलला पाचोरा (ता. जळगाव) येथे सभा होणार आहे. या सभेचा टिझर रिलीज झाला असून कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह वाढला आहे. सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे.

यानिमित्ताने उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या सभेचे आयोजन माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे. या सभेला खासदार संजय राऊत हेही उपस्थित राहणार आहेत. ठाकरे यांच्या सभेपूर्वीच जळगाव जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे.

Sanjay Raut & Gulabrao Patil Latest News
Mumbai News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; उपजिल्हाप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेते, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेपूर्वीच वातावरण तापवण्यास सुरवात केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. "माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत," असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Sanjay Raut & Gulabrao Patil Latest News
Maharashtra Government : सनदी अधिकाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; शेअर मार्केट गुंतवणुकीची..

गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत येणार असल्यामुळे राऊतांच्या रडारवर गुलाबराव पाटील हे असणारच. त्यामुळे राऊतांच्या भाषणाचा धसका गुलाबरावांनी घेतला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण गुलाबरावांनी आधीच राऊतांना इशारा दिला आहे.

"पुतळ्याचे अनावर करण्यासाठी येत असतील, तर जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी उद्या एसपींना पत्र देणार आहे. त्यांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा मी सभेत घुसेल," असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com