Video Lal krishna Advani : लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, तब्येत बिघडली

BJP leader LK Advani Admitted to AIIMS : एम्सच्या युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अमलेश सेठ हे अडवाणी यांच्यावर उपचार करत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
Lal krishna Advani
Lal krishna AdvaniSarkarnama

Lal Krishna Advani Hospitalised: माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वयोमानानुसार त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या (AIIMS) युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अमलेश सेठ हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

लालकृष्ण अडवाणी Lal krishna Advani यांचे वय 96 वर्ष आहे. प्रकृतीमुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसतात. नुकताच त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देत सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या निवास्थानी जाऊन दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा तसेच अडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Lal krishna Advani
Sam Pitroda News : वादग्रस्त सॅम पित्रोदा यांच्यावर काँग्रेसचा पुन्हा 'वरदहस्त'; थेट 'या' पदावर नियुक्ती

स्वयंसेवक ते गृहमंत्री

1941 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी संघाच्या शाखेत जाण्यास सुरवात केली. राजस्थानमध्ये त्यांनी प्रचारक म्हणून काम देखील केले आहे. 1951 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघामध्ये अडवाणी सामील झाले.

जनसंघात त्यांनी प्रभारी, महासचिव, दिल्लीचे अध्यक्ष अशी विविध पद भूषवली. अटबिहारी वाजपेयी यांच्या सोबत भाजपच्या BJP संस्थापक सदस्यांपैकी एक अडवाणी आहेत. ते पक्षाचे तीन वेळा अध्यक्ष देखील होते. भाजपच्या सत्ताकाळात अटबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना लालकृष्ण अडवाणी हे उपपंतप्रधान, गृहमंत्री होते.

Lal krishna Advani
AIADMK MLA Suspended : तामिळनाडूत मोठी राजकीय घडामोड! विरोधी पक्षाचे सर्व आमदार निलंबित!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com