विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात हक्कभंग अन् थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

आमदारांना प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची धमकी दिल्याने विरोधी पक्षनेते अडचणीत आले आहेत.
Suvendu Adhikari
Suvendu AdhikariSarkarnama
Published on
Updated on

कोलकता : विधानसभेतील भाषणादरम्यान अडथळा आणणाऱ्या भाजपच्या चार बंडखोर आमदारांना प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची धमकी देणे विरोधी पक्षनेत्यांना महागात पडले आहे. विरोधी पक्षनेत्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. हा प्रकार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) घडला आहे. यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) विरुद्ध भाजप (BJP) अशी लढाई सुरू झाली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत स्वीकारण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला आहे, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. तर भाजपच्या सदस्यांना निषेध करीत सभात्याग केला. यावरून अधिकारींनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्ष माझ्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी सरकारने बंडखोर भाजप आमदारांचा वापर केला. असे आधी कधीही घडले नव्हते. त्यांनी आधी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत. तुम्ही माझ्या विरोधात हक्कभंग आणून दाखवा.

Suvendu Adhikari
सरकारची मोठी घोषणा अन् त्यानंतर 24 तासांतच राणेंना आजीवन कॅबिनेटचा दर्जा बहाल

भाजपचे बंडखोर आमदार कृष्णा कल्याणी, तन्मय घोष, सौमेन रॉय, विश्वजित दास यांनी मागील वर्षी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. अधिकारी हे विधानसभेत बोलत असताना या चार आमदारांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणले होते. अधिकारी हे सातत्याने राज्य सरकारविरोधात खोटानाटा प्रचार करीत आहेत, असा आरोप या आमदारांनी केला. यामुळे संतापलेल्या अधिकारींना या आमदारांना प्राप्तिकर विभागाचे छापे टाकण्याची धमकी दिली. या आमदारांना याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांनी या तक्रारीची दखल घेऊन सभागृहाच्या नियमानुसार या चार आमदारांना संरक्षण देण्याचे जाहीर केले.

Suvendu Adhikari
'काश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; भाजपच्या मित्रपक्षानेच टाकला बॉम्ब

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत (Civic Polls) तृणमूलच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विरोधकांना धूळ चारली होती. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले होते. सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममतांचा पराभव केला होता. नंदिग्राम हा अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. नंतर ममता या भवानीपूरमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. आता ममतांनी या पराभवाची परतफेड केली. अधिकारी कुटुंबीयांचे तब्बल 40 वर्षापासून वर्चस्व असलेली कंठी महापालिका तृणमूलने हिरावून घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com