विमानात नवीनच्या मृतदेहाला जास्त जागा लागेल; भाजप आमदारानं जखमेवर चोळलं मीठ

रशियाने खारकीव शहरात केलेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह अजूनही युक्रेनमध्येच आहे.
Arvind Bellad, Naveen Shekharappa
Arvind Bellad, Naveen ShekharappaSarkarnama

बेंगलुरू : रशियाच्या (Russia) युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात मृत्यू झालेल्या नवीन शेखरप्पा (Naveen Shekharappa) या विद्यार्थ्याचा मृतदेह लवकरात लवकर आणण्यासाठी त्याचे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना तसं आश्वासन दिलं आहे. पण कर्नाटकातील भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करून कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. विमानातून मृतदेह आणण्यासाठी जास्त जागा लागेल, असं या आमदारानं म्हटलं आहे.

हुबळी-धारवाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार अरविंद बेलाड (Arvind Bellad) यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे. नवीनचा मृतदेह मायदेशी कधी आणणार, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नवीनचा मृतदेह परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पण युक्रेनमध्ये (Ukraine) युध्द सुरू असून सर्वांना त्याची जाणीव आहे. प्रयत्न सुरू असून शक्य झाल्यास लवकरच मृतदेह परत आणला जाईल, असे बेलाड यांनी सांगितले. (Russia Ukraine War)

Arvind Bellad, Naveen Shekharappa
पुन्हा चेर्नोबिलची भीती; युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग

पुढे बोलताना बेलाड म्हणाले की, जिवंत नागरिकांना परत आणणेच आव्हानात्मक आहे. त्यामुळे मृतदेह परत आणणे अधिक कठीण झाले आहे. मृतदेहाला विमानात अधिक जागा लागेल. त्यामुळे एका मृतदेहाच्या जागी आठ ते दहा लोकांना परत आणले जाऊ शकतात, असं वक्तव्य बेलाड यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांच्याकडून नवीनचा मृतदेह परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बेलाड यांनी सांगितले.

नवीनचे वडील शेखरप्पा ज्ञानगौडा यांनी बुधवारी सांगितले होते की, नवीनचा मृतदेह दोन दिवसांत मायदेशी आणला जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पंतप्रधान मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही यांनाही याबाबत विनंती केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नवीन शेखरप्पा हा एकवीस वर्षांचा होता. युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्ह या शहरात तो वैद्यकीय पदवीचे चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.

Arvind Bellad, Naveen Shekharappa
रशियाची मोठी खेळी; पळून गेलेल्या माजी राष्ट्राध्यक्षांनाच पुन्हा गादीवर बसवण्याची तयारी

कर्नाटकमधील हावेरी याठिकाणी त्याचे कुटुंबीय राहतात. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रशियाच्या बॉम्बहल्ल्याचा नवीन बळी ठरला आहे. नवीन हा एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी सुपर मार्केटबाहेर रांग लागली होती. नवीन रांगेत उभा असतानाच जवळच झालेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com