Priyanka Gandhi : भाजप खासदारांनी प्रियांका गांधींना दिले खास ‘गिफ्ट’; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण...

BJP MP Aparajita Sarangi Parliament Congress MP : भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी आज ‘गांधीगिरी’ करत प्रियांका गांधींना एक बॅग गिफ्ट दिली.
Priyanka Gandhi, Aparajita Sarangi
Priyanka Gandhi, Aparajita SarangiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील काही दिवसांत काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आगळ्यावेगळ्या बॅगा संसदेत आणत प्रतिकात्मक आंदोलन केले होते. मग तो गौतम अदानींचा मुद्दा असो की बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ले... प्रियांका यांनी अशा बॅगांच्या माध्यमातून संबंधित घटनांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. भाजपने शुक्रवारी अशीच एक बॅग त्यांना भेट पलटवार केला आहे.

भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी शुक्रवारी प्रियांका गांधी यांना ही बॅग भेट दिली. या बॅगेवर 1984 असे लिहिले होते. त्यामुळे सारंगी यांनी गांधीगिरी करत प्रियांका गांधींना एकप्रकारे 1984 मध्ये झालेल्या दंगलीची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे या गांधीगिरीची संसदेत चर्चा रंगली होती.

Priyanka Gandhi, Aparajita Sarangi
Gautam Adani Case : अमेरिकेतील अदानी प्रकरणात मोठी घडामोड; ‘अ‍ॅटर्नी’ देणार राजीनामा; काय घडलं पडद्यामागे?

याबाबत बोलताना अपराजिता सारंगी म्हणाल्या, खासदार प्रियांका गांधी यांना फॅशनेबल बॅगची आवड असल्याने त्यांना ही बॅग गिफ्ट दिली. सुरूवातीला त्यांनी बॅग घेण्यास नकार दिला. पण नंतर त्यांनी बॅग घेतल्याचेही सारंगी यांनी स्पष्ट केले. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

प्रियांका गांधी यांना भेट दिलेल्या बॅगेवर 1984 हे साल लाल रंगात लिहिले असून रक्ताचे ओघळ येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावेळी झालेल्या शीखविरोधी दंगलीवर बोट ठेवण्यात आले आहे. त्यावर सध्याच्या पिढीला काँग्रेसने मागील 50 वर्षांत काय केले हे कळायला हवे, असे सारंगी म्हणाल्या आहेत. 

Priyanka Gandhi, Aparajita Sarangi
Om Birla : धक्काबुक्की प्रकरणानंतर ओम बिर्ला यांचा मोठा निर्णय!

मागील काही दिवसांत प्रियांका गांधींनी तीनवेळा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग संसदेत आणल्या होत्या. यापार्श्वभूमीवर सारंगी यांनी ही कृती केली. एका बॅगवर पॅलेस्टाईन असे लिहिले होते. या माध्यमातून त्यांनी आपले पॅलेस्टाईनला समर्थन असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. दुसऱ्या बॅगेवर आपण बांग्लादेशातील हिंदूसोबत असल्याचे म्हटले होते. त्याआधी त्यांनी मोदी-अदानी भाई भाई असे लिहिलेली बॅग संसदेत आणली होती.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com