वडील विरोधी पक्षाचे उमेदवार अन् भाजपच्या खासदार मुलीने दाखवला पक्षाला ठेंगा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या वडिलांसारखे आहेत, असं संघमित्रा मौर्य यांनी म्हटलं आहे.
Sanghamitra Maurya
Sanghamitra MauryaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : योगी सरकारमधील माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्या पराभवासाठी भाजपने कंबर कसली आहे. मौर्य यांची मुलगी संघमित्रा या भाजपच्या खासदार आहेत. पण त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे माझ्या वडिलांसारखे आहेत. पण पक्षाने सांगितले तरी मी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात प्रचार करणार नाही, असं संघमित्रा (Sanghamitra Maurya) यांनी थेट सांगून टाकलं.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखा बडा नेता समाजवादी पक्षात (Samajwadi Party) गेल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यांची कन्या संघमित्रा या भाजपच्या खासदार असल्याने त्याही भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकारणात सुरू आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, वडिलांनी पक्ष सोडताना माझ्याशी चर्चा केली नव्हती. पण मीही भाजपला रामराम करावा, असा दबाव नव्हता. मी भाजपसोबत आणि भाजपसोबतच राहीन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (UP Election 2022)

Sanghamitra Maurya
सुवर्ण मंदिरात राहुल गांधींचा खिसा कापला? हरसिमरत कौर यांनी उडवून दिली खळबळ

कौटुंबिक आयुष्य आणि राजकीय आयुष्यामध्ये खूप फरक आहे. मी संपूर्ण राज्यात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करेन, पण पक्षाने सांगितले तरी मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही, असंही संघमित्रा यांनी सांगितलं. याबाबत मला पक्षाने अद्याप कोणताही खुलासा मागितला नाही. पक्षाप्रति माझा प्रामाणिकपणा सिध्द करण्याची गरज मला वाटत नाही. माझ्या वडिलांनी पक्ष सोडला आहे तो त्यांच्या लढाईसाठी. पण मला तेच काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राहून करायचे आहे, असे संघमित्रा यांनी नमूद केले. (Uttar Pradesh Election Update)

दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला (Congress) धक्का देऊन माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. आता त्यांचा सामना भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले मातब्बर नेते स्वामीप्रसाद मौर्य यांच्याशी होणार आहे. यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Sanghamitra Maurya
राऊत शब्दाचे पक्के; उत्पल पर्रीकरांचा अर्ज वैध ठरताच घेतला मोठा निर्णय

सिंह हे पडरौना मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. या मतदारसंघात मौर्य हे विद्यमान आमदार आहेत. मौर्य यांच्या विरोधात लढण्यासाठी बलाढ्य नेत्याचा शोध भाजपकडून सुरू होता. अखेर सिंह यांच्या रुपाने हा नेता मिळाला आहे. सिंह आणि मौर्य या दोघांनीही या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. मौर्य यांनी भाजपला धक्का देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपला मोठी गळती लावली होती.

सिंह यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसप्रमाणेच समाजवादी पक्षालाही फटका बसू शकतो, असे मानले जात आहे. सिंह हे कुशीनगर जिल्ह्यातील आहे. ते 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कुशीनगर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर त्यानंतर त्यांना लगेच काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले होते. नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पडरौना विधानसभा मतदारसंघाचे 1996, 2002 आणि 2007 मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com