BJP MP News : सिंह कधीही कुत्र्यांची शिकार करत नाही! दलित IAS बाबत भाजप खासदार बरळले; वाद पेटला

BJP MP Trivendra Singh Rawat Latest Update IAS Officer Controversy BJP Leader News : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे हरिद्वारचे खासदार त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
Trivendra Singh Rawat
Trivendra Singh RawatSarkarnama
Published on
Updated on

Uttarakhand News : माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ खासदारांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सिंह कधी कुत्र्याची शिकार करत नाही, असे विधान त्यांनी एका दलित IAS अधिकाऱ्यांविषयी केले आहे. त्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून आयएएस असोसिएशनने खासदाराच्या या विधानाचा निषेध केला आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे हरिद्वारचे खासदार त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. राज्याचे खाणकाम विभागाचे सचिवव ब्रजेश संत यांच्याविषयी त्यांना ‘कुत्रा’ असा शब्द वापरला आहे. आयएएस अधिकारी संत हे दलित समाजातील असल्याने राज्यातील आयएएस असोसिएशनने रावत यांच्या विधानाला जातीयवादी म्हटले आहे.

Trivendra Singh Rawat
Bihar elections leadership: 'एनडीए'चा प्लॅन ठरला; बिहारच्या निवडणुका होणार 'यांच्या' नेतृत्वाखाली; अमित शाहांचे संकेत

उत्तराखंडमध्ये सध्या अवैध खाणकामाचा मुद्दा तापला आहे. काही दिवसांपूर्वी रावत यांनी याबाबत संसदेत भाष्य केले होते. विशेष म्हणजे राज्यात भाजपचेच सरकार आहे. ब्रजेश संत यांनी रावत यांचा हा दावा खोडून काढला होता. संत यांनी अवैध खाणकाम होत नसल्याचे सांगताच रावत त्यांनी मीडियाशी बोलताना काय बोलू? ‘सिंह कधी कुत्र्यांची शिकार करत नाही,’ असे विधान केले.

रावत यांच्या या विधानानंतर आयएएस अधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आयएएस असोसिएशनही विविध संघटनांनी रावत यांच्या विधानाचा निषेध करत माफीची मागणी केली आहे. काही ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले. दरम्यान, राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी रावत यांच्यावरच पलटवार केला होता. पक्षाच्या पारदर्शक धोरणांमुळे कायदेशीर खाणकामातून राज्याच्या महसूल वाढल्याचे भट्ट् यांनी सांगितले.

Trivendra Singh Rawat
Amit Shah News : अमित शाह यांनी केली सीतामातेच्या मंदिराची घोषणा; कुठे उभारणार?

विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांनी रावत यांचे समर्थन करत राज्यात अवैध खाणकामाला सरकारकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही त्रिवेंद्र रावत यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सांगितले होते. केंद्र आणि उत्तराखंड सरकार अवैध खाणकामाविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. वाळू माफियांनी नद्यांमध्ये अवैध खणन केल्याचा आरोप रावत यांनी केला. रावत यांनी त्रिवेंद्र यांच्या अधिकाऱ्यांविषयीच्या विधानावरही टीका केली. सरकारी अधिकाऱ्यांचा सन्मान करायला हवा, असे ते म्हणाले आहेत.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com