Bihar elections leadership: 'एनडीए'चा प्लॅन ठरला; बिहारच्या निवडणुका होणार 'यांच्या' नेतृत्वाखाली; अमित शाहांचे संकेत

NDA Bihar Elections 2025 News : बिहारमध्ये 243 पैकी 225 जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवले आहे. हे लक्ष्य कसे गाठायचे यावरही विचारमंथन झाले.
Pune BJP, Amit shah
Pune BJP, Amit shahSarkarnama
Published on
Updated on

Patana News : बिहारमधील विधानसभा निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्याबाबत एनडीएची बैठक नुकतीच पार पडली. याठिकाणी एनडीएमध्ये पाच पक्ष आहेत. त्यामुळे एकत्रित निवडणूक लढत असताना त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो, एनडीएला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबतच बिहारमध्ये 245 पैकी 225 जागा जिंकण्यासाठी प्लॅन ठरला आहे. त्यासोबतच येत्या काळात बिहारमधील निवडणूका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, अशी महत्वपूर्ण घोषणा भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) शनिवारी बिहार दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भाजपचे कार्यालय प्रभारी विनोद तावडे, दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा, भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल, सर्व आमदार, आमदार, खासदार आणि राज्याचे अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी बिहारमध्ये 243 पैकी 225 जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवले आहे. हे लक्ष्य कसे गाठायचे यावरही विचारमंथन झाले.

यासोबतच एनडीए आक्रमक रणनीती घेऊन मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा कानमंत्र यावेळी शहा यांनी प्रमुख नेतेमंडळींना दिला आहे.

Pune BJP, Amit shah
BJP Politics : भाजपने हकालपट्टी करताच आमदार पाटलांची मोठी घोषणा; हिंदू पक्षाचे दिले संकेत...

शाह म्हणाले, "एनडीएमध्ये पाच पक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो, एनडीएला विजयी करायचे आहे. बिहारमध्ये एवढा मोठा विजय व्हावा, हा संदेश संपूर्ण देशाला द्यायला हवा. पक्षात काही मतभेद असतील तर ते विसरून एकत्र या आणि एनडीएला विजयी करा."

Pune BJP, Amit shah
BJP in West Bengal : 'भाजप जिंकला नाही, तर हिंदू बंगाली वाचणार नाहीत'; मिथुन चक्रवर्तीच्या विधानानं खळबळ

अमित शहा यांनी नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या नेतृत्वाबाबत संभ्रमाची स्थिती स्पष्ट केली आहे. एनडीए आगामी विधानसभा निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Pune BJP, Amit shah
Mahayuti political conflict : महायुतीमधील सुप्त संघर्ष तीव्र होणार? विधिमंडळ समित्यावरून मंत्रिपद हुकलेल्या आमदारांचे पुनर्वसन, नाराजांचे काय?

यावेळी अमित शहा म्हणाले, 'जी काही उणीव आहे, तिचे ताकदीत रूपांतर करावे लागेल. ज्या बूथवर आपण हरलो किंवा कमी मते मिळविली ते बूथ जिंकायचे आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ही रणनीती यशस्वी झाली. भाजप, जेडीयू, एलजेपी रामविलास, एचएएम, आरएलएम यांना पूर्णपणे एकत्र राहावे लागेल. बिहारमध्ये एनडीएचे हेच स्वरूप असेल. बिहारमध्ये स्थिर सरकार देण्यासाठी एनडीए कटिबद्ध आहे.'

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Pune BJP, Amit shah
Santosh Deshmukh last words : अपहरणानंतर संतोष देशमुखांचा शेवटचा शब्द काय होता? चालकाने सर्व घटनाक्रमच सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com