BJP National President : दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं; 'ही' दोन नावे सर्वात आघाडीवर

BJP President Election 2025 News : राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : लोकसभा निवडणुकीचे निकाल गेल्यावर्षी 4 जूनला लागले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत 7 जूनला संपली होती. त्यामुळे लवकरच भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता होती. मात्र, संघटनात्मकदृष्ट्या पक्षात मोठे बदल केले जाणार असल्याने नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीला जवळपास वर्षभराचा कालावधी लागला.

जेपी नड्डा यांचा लोकसभा निवडणूकीसाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन नव्या अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मार्च महिन्यात नागपूर दौऱ्यावर होते. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला होता. मात्र, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर भाजपने सर्व प्रक्रिया थांबवली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेलया संघटनात्मक निवड प्रक्रियेला वेग आला आहे. महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदाची निवड जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेला वेग येणार आहे.

Narendra Modi, Amit Shah
Vaishnavi Hagwane : "एकतर्फी प्रेमाची बाब होती, पण..." हगवणेच्या वकिलांनी उल्लेख केलेल्या 'त्या' चॅटिंगबाबत वैष्णवीच्या मामांनी केला मोठा खुलासा

लोकसभा निवडणूक झाल्यावर भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणे अपेक्षित होते. मात्र, निवडीसाठी उशीर लागत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लवकरच अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. याअंतर्गत भाजपची अनेक राज्यात संघटनात्मक निवाडणुक पार पडणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

Narendra Modi, Amit Shah
Vaishnavi Hagawane Court Case : वैष्णवीच्या चारित्र्यहणन, हगवणे कुटुंबाच्या वकिलांचा अजबच युक्तीवाद

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) आणि भूपेंद्र यादव या दोघांची नावे चर्चेत आहेत. मात्र दोघांचा अनुभव पाहता धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आता लवकरच भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Narendra Modi, Amit Shah
Narayan Rane : उद्धव अन् राज ठाकरेंवर नारायण राणे नेमके का संतापले?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात नागपूरच्या रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

Narendra Modi, Amit Shah
Sangli BJP : सांगलीत भाजपला घरचा आहेर? पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत नेत्याने केली श्वेतपत्रिकेची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com