Vote Rigging : मतदानात हेराफेरी, 'CID'कडून एकाला अटक; राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतदारसंघात काय घडलं?

CID Arrests West Bengal Man in Karnataka Aland Vote Rigging Case Rahul Gandhi : कर्नाटक राज्यातील आळंद विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर मतदार वगळण्यासाठी अर्ज दाखल केले होते.
Rahul Gandhi news
Rahul Gandhi newsSarkarnama
Published on
Updated on

Vote rigging case arrest : मतदान हेराफेरी, मतचोरीवरून काँग्रेसच्या राहुल गांधींचा नेहमीच हल्लाबोल चालू राहिला आहे. बिहार निवडणुकीच्या मतदानापूर्वी देखील त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीविषयी 'हायड्रोजन बाॅम्ब' फोडला होता.

बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर देखील विरोधकांकडून शंका घेतली जात असतानाच, कर्नाटक राज्यातील आळंद विधानसभा मतदारसंघात मतदान हेराफेरीच्या आरोपांच्या तपासात 'सीआयडी'ने मोठा लिड मिळाला आहे. पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातून बापी आद्या (वय 27) याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी बापी आद्या याला बंगळूर इथं आणण्यात आलं असून, न्यायालयाच्या परवानगीनंतर 'सीआयडी'ने त्याला चौकशीसाठी ताब्यात ठेवलं आहे.

कर्नाटक राज्यातील आळंद विधानसभा मतदारसंघात 2023च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानात (Voter) हेराफेरी झाल्याचा आरोप झाले होते. मतदार वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. या काळात बँकांद्वारे संशयास्पद व्यवहार झाले होते. काँग्रेस आमदार बी. आर. पाटील, मंत्री प्रियांक खर्गे यांनी हा प्रकार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. पण सीईओ कार्यालयाकडून यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मतदार याद्यांची परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्यात आली.

बी. आर. पाटील यांनी, ‘दलित आणि अल्पसंख्याक मतदारांसह एकूण 6,994 ‘काँग्रेस (Congress) समर्थक’ मते वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. ही मते वगळली गेली असती, तर निश्चितच माझा पराभव झाला असता.’ 2023 च्या निवडणुकीत पाटील यांनी भाजप उमेदवार सुभाष गुत्तेदार यांचा 10,000 मतांनी पराभव केला होता.

Rahul Gandhi news
Bihar Election Result : "फक्त 'एकच' गोष्ट करा, बिहारनंतर नेपाळमध्येही BJP सरकार येईल"; स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरची बोचरी टीका

नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’ कशी केली जात असल्याचे आरोपांसह स्पष्टीकरण दिले आणि आळंद मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. या प्रकरणाला गांभीर्याने घेत कर्नाटक सरकारने ‘मतचोरी’ प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बी. के. सिंह करीत आहेत.

Rahul Gandhi news
BMC Scam: बीएमसी सहाय्यक आयुक्त स्कॅम प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर; 'त्या' 100 अधिकाऱ्यांना अडकवण्याचा होता 'प्लॅन'

काय आहे प्रकरण

कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत 6 हजार 018 मतदारांची नावं हटवण्याची फसवणूक उघडकीस आलं. 'एसआयटी'च्या तपासात या प्रकरणात अनेक बाबी समोर आल्या. ज्यात डेटा सेंटर, तरुण कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर यांचा समावेश आहे. मतदारयादीतून नाव काढण्यासाठी प्रत्येक मतासाठी 80 रुपये दिल्याचे उघड झाले आहे. पण यासाठी कोणी पैसे खर्च केले याबाबत 'एसआयटी'ने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

गुत्तेदारांच्या घरावर छापे

'एसआयटी'च्या तपासानुसार, ही रक्कम कलबुर्गी जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका डेटा सेंटरमध्ये काम करणाऱ्या 4 ते 5 युवकांना मिळाली होती. ही मुलं 20 ते 30 वर्षे वयोगटाची होती. या विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुभाष गुत्तेदार, त्यांचे सहकारी, डेटा सेंटरचा मालक आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर पथकाने छापा टाकला होता. तेव्हा 'एसआयटी'च्या तपासात ही रक्कम आणि संबंधित माहिती समोर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com