Rajasthan Assembly Results 2023 : मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, भाजप जिंकेल!

Rajasthan Assembly Results 2023 News : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप विजयी होईल," असे शेखावत म्हणाले.
 Gajendra Singh Shekhawat
Gajendra Singh Shekhawat Sarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Election 2023 Result in Marathi :राजस्थानच्या सत्तेची चावी कुणाकडे असणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. राजस्थानात सत्ता परिवर्तन होणार की, परंपरा टिकणार, हे लवकरच समजेल. सध्या हाती आलेल्या निकालावरून राजस्थानमध्ये भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे.

राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री, भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "भाजपला प्रचंड बहुमत मिळेल, असे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप विजयी होईल," असे शेखावत म्हणाले.

नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विश्वराज सिंह ६०८ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी येथे रिंगणात आहेत, तर भरतपूरमधून राष्ट्रीय लोकदल निवडणूक लढवित आहे. नदबाईमध्ये भाजप आघाडीवर, नगरमध्ये काँग्रेस आघाडीवर, वैरमध्ये भाजप आघाडीवर आहे.

 Gajendra Singh Shekhawat
Assembly Elections Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी; छत्तीसगड काँग्रेसने राखले, तेलंगणात केसीआर यांना बायबाय

बयाना आणि कामामध्ये अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. राजस्थानमधील राजसमंदमधील कुंभलगड मतदारसंघातून भाजपचे सुरेंद्र सिंह राठोड 1,181 मतांनी आघाडीवर आहेत. झालावाडच्या खानपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश गुर्जर 195 मतांनी आघाडीवर आहेत.

तिजोरी मतदारसंघातून राजस्थान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले बाबा बालकनाथ आणि इम्रान खान यांच्यात लढत होत आहे. राजस्थानचे योगी म्हणून ओळखले जाणारे बाबा बालकनाथ हे आघाडीवर आहेत. भाजपला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीत असतील, असे बोलले जाते.

पहिल्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ८ हजार ३६४ मते मिळाली असून, इम्रान खान केवळ ९२८ मते मिळाली आहेत. सुरुवातीपासून बाबा बालकनाथ यांनी आघाडी घेतली आहे. बाबा बालकनाथ सध्या अलवर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. आता ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 Gajendra Singh Shekhawat
Rajasthan Assembly Results 2023 : राजस्थानच्या CM पदाचे दावेदार बाबा बालकनाथ आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com