BJP President Election : भाजपला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष; अशी होणार निवड...

JP Nadda National President Bhartiya Janata Party : भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत काही महिन्यांपुर्वीच संपली आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भारतीय जनता पक्षाला लवकरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना जून 2024 पर्यंतच मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे भाजपमध्ये नवे अध्यक्ष निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.

जे. पी. नड्डा यांना केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणे त्यांना शक्य होणार नसल्याने डिसेंबरपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड होऊ शकते. अध्यक्षांच्या निवडणुकीआधी देशभरात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहिम हाती घेतली जाणार आहे.

Narendra Modi, Amit Shah
Gaurav Gogoi : काँग्रेसकडून गौरव गोगोई यांच्यावर मोठी जबाबदारी; संसदेत राहुल गांधींना देणार साथ

भाजपच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. त्यानंतर सदस्य नोंदणीची मोहिम हाती घेतली जाईल. भाजपच्या घटनेनुसार नऊ वर्षानंतर प्रत्येक सदस्याला आपल्या सदस्यत्वाचे पुनर्नोंदणी करावी लागते. त्यामुळे यावर्षी सर्व प्रमुख नेत्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे.

सदस्य नोंदणी झाल्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मंडल अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर जिल्हा अध्यक्षांची निवडणूक 16 ते 30 नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य आणि केंद्रातील प्रमुख समित्यांच्या निवडी होतील. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचाही समावेश असेल.

Narendra Modi, Amit Shah
NEXT CM : सत्तारांच्या दाव्याने महायुतीत वाद वाढणार; ‘पुढच्या आषाढीला एकनाथ शिंदेच विठ्ठलाची महापूजा करतील’

प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू होईल. देशातील 50 टक्के प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया भाजपसाठी महत्वाची असून पुढील राजकीय वाटचालीच्यादृष्टीने नवीन दिशा देणारी ठरणार आहे.

नवीन अध्यक्ष कोण?

भाजपचे नवे अध्यक्ष कोण असतील, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील नेते व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पुढील पाच महिने भाजपमधील संघटनात्मक बांधणीसाठी महत्वाचे मानले जात आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com