JDS joins NDA : 'जेडीएस' चा 'एनडीए' मध्ये सहभाग; कुमारस्वामींनी घेतली अमित शाहांची भेट

Karnataka Lok sabha : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचा समावेश झाल्याचे जाहीर केले.
JP Nadda, Amit Shah, H. D. Kumaraswamy
JP Nadda, Amit Shah, H. D. KumaraswamySarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे 'एनडीए' बैठका घेत रणनीती आखत आहे. तर दुसरीकडे 'इंडिया आघाडी' सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मूट बांधत आहे. असे असतानाच आता 'एनडीए'मध्ये आणखी एक पक्ष सहभागी झाला आहे.

जनता दल सेक्युलर पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचा समावेश झाल्याचे जाहीर केले.

JP Nadda, Amit Shah, H. D. Kumaraswamy
MP Ramesh Bidhuri : भाजप खासदार रमेश बिधुडींचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य; राजनाथ सिंहांनी मागितली माफी

या भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह, जे.पी.नड्डा, कुमारस्वामी यांच्यात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. जनता दल (सेक्युलर) पक्षाने 'एनडीए'ला समर्थन दिल्यामुळे आता 'एनडीए'ची ताकद आणखी वाढणार आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता आणण्यात अपयश आलं. त्यानंतर आता भाजपने जनता दल (एस) पक्षाला सोबत करण्याचा निर्णय घेतल्याने कर्नाटकमध्येही आगामी काळात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 'इंडिया आघाडी' आणि 'एनडीए' आपली ताकद वाढवण्यावर भर देत असतानाच 'जेडीएस'ने भाजपशी युती केल्यामुळे 'इंडिया आघाडी'साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

JP Nadda, Amit Shah, H. D. Kumaraswamy
Sarkarnama Podcast : छगन भुजबळांना गद्दारी भोवली ; बाळा नांदगावकरांनी दिवसा तारे दाखवले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com