MP Ramesh Bidhuri : भाजप खासदार रमेश बिधुडींचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य; राजनाथ सिंहांनी मागितली माफी

BJP MP Ramesh Bidhuri On BSP MP Danish Ali : लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुडी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले.
BJP MP Ramesh Bidhuri and BSP MP Danish Ali
BJP MP Ramesh Bidhuri and BSP MP Danish Ali Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. रमेश बिधुडी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुडी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

रमेश बिधुडी हे लोकसभेत चांद्रयान ३ च्या संदर्भात बोलत होते. याचवेळी बिधुडी यांनी खासदार दानिश अली यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त शब्दांचा वापर केला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. काँग्रेस आणि 'टीएमसी'ने रमेश बिधुडी यांच्या वक्तव्यावरून भाजवर जोरदार टीका केली.

BJP MP Ramesh Bidhuri and BSP MP Danish Ali
Rahul Narwekar Delhi Visit : सुप्रीम कोर्टाने कान उपटल्यानंतर धडकी भरलेल्या राहुल नार्वेकरांनी घेतली महाधिवक्ता तुषार मेहतांची भेट

यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रमेश बिधुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली. तसेच लोकसभेच्या कामकाजातून बिधुडी यांचे वादग्रस्त वक्तव्य काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी बिधुडी यांचे वादग्रस्त वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकले.

रमेश बिधुरी हे भाजपचे दक्षिण दिल्लीतील खासदार आहेत. त्यांनी बसपा खासदार दानिश अली यांना दहशतवादी म्हणून सभागृहात संबोधल्याने विरोधकांनी त्यांच्या शब्दावर आक्षेप घेतला. रमेश बिधुरी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजपचे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे लोकसभेत हसताना दिसले. त्यामुळे विरोधकांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

Edited By- Ganesh Thombare

BJP MP Ramesh Bidhuri and BSP MP Danish Ali
Sarkarnama Podcast : छगन भुजबळांना गद्दारी भोवली ; बाळा नांदगावकरांनी दिवसा तारे दाखवले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com