Ladki Bahin Yojana : भाजपसाठी हरियाणातील बहिणी महाराष्ट्रापेक्षा लाडक्या; निवडणुकीआधी 20 मोठ्या घोषणा...

Haryana Assembly Election BJP Maharashtra : हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून गुरूवारी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला.
Haryana BJP
Haryana BJPSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : हरियाणामध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असलेल्या लाडकी बहीण योजनेप्रमाणेच हरियाणातील महिलांनाही मोठे आश्वासन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. हरियाणामध्ये ही रक्कम 2100 रुपये असेल.

भाजपने हरियाणातील महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे. महाराष्ट्रातील महिलांपेक्षा ही रक्कम 600 रुपयांनी अधिक आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅस 500 रुपयांत देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे. भाजपने यातून 20 मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Haryana BJP
Atishi Oath Ceremony : त्या जिंकल्या...आता इतिहास घडवणार! सिसोदियांचे ते शब्द 21 तारखेला खरे ठरणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते गुरूवारी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. त्यानुसार महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या अग्नीवीरांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माजी अग्निवीरांना पक्की नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 24 शेतपीकांना एमएसपीचे आश्वासनही देण्यात आले आहे.

हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपकडून रोजगार, पायाभूत सुविधा आणि लोकल्याण काही योजनांवर भर देण्यात आल्याचे दिसते. राज्यात 10 औद्योगिक शहरांची निर्मिती, त्यामाध्यमातून प्रत्येक शहरात 50 हजार स्थानिकांना नोकरी, दोन लाख सरकारी नोकरभरती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Haryana BJP
JP Nadda : मसाला, विष, केमिकल, हातोडा अन् 110 शिव्या! खर्गेंना लिहिलेल्या पत्रात नड्डांनी सगळंच काढलं...

चिरायू आयुष्यमान योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातील. तर ज्येष्ट नागरिकांसाठी त्यामध्ये अतिरिक्त पाच लाखांची सवलत असेल. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसिस व तपासण्या होतील. हर घर गृहिणी योजनेअंतर्गत 500 रुपयांत गॅस सिलिंडर, ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी स्कूटर देणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे.

दरम्यान, हरियाणामध्ये 90 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. प्रामुख्याने भाजप आणि काँगेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार असली तरी आम आदमी पक्षाकडूनही बहुतेक सर्वच जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com