New Delhi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिताच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा चांगलेच संतापले आहेत. त्यांनी लगेच खर्गेंना पत्र लिहित मनातलं सगळंच बोलून दाखवलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर कडक शब्दांत प्रहार करत नड्डांनी खर्गेंना प्रत्युत्तर दिले आहे.
मागील काही दिवसांत राहुल गांधी यांच्याविषयी भाजपसह एनडीएतील काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यावरून खर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहिल कारवाईची मागणी केली होती. याच पत्राला नड्डांनी उत्तर दिले आहे.
खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात नड्डा यांनी म्हटले आहे की, देशातील सर्वात जूना राजकीय पक्ष आता आपल्या नामदार युवराजाच्या दबावाखाली ‘कॉपी आणि पेस्ट’ करणारा पक्ष बनला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मागील दहा वर्षांत देशाच्या यशस्वी पंतप्रधानांना 110 हून अधिक शिव्या दिल्या. त्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्वही सहभागी आहे, हे दुर्दैवी आहे. तेव्हा तुमच्या आणि काँग्रेसच्या डिक्शनरीतून मर्यादा, अनुशासन, शिष्टाचार हे शब्द काय गायब होतात, असा सवाल नड्डा यांनी केला आहे.
काँग्रेसची कथित मोहब्बत की दुकानात जे प्रोडक्ट विकले जात आहे ते जातीवादाचे विष आहे, राष्ट्रविरोधाचा मसाला आहे, देशाला बदनाम करण्याचे केमिकल आहे आणि देशाला तोडणारा हातोडा आहे, अशी टीका नड्डा यांनी राहुल गांधींवर केली आहे. देशाच्या महान लोकशाही सर्वाधिक अपमानित कुणी केले असेल तर ती काँग्रेस आहे. काँग्रेसने आणीबाणी लादली, ट्रिपल तलाकचे समर्थन केले आणि संविधानिक संस्थांना बदनाम केल्याचा हल्लाबोल नड्डा यांनी केला.
काँग्रेसला राहुल गांधींवर एवढा गर्व कसला आहे, असा सवाल करत नड्डा यांनी म्हटले आहे की, ते पाकिस्तानसमर्थक भारतविरोधी लोकांसोबत आहेत म्हणून की दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या कार्यक्रमांना जातात म्हणून त्यांच्यावर गर्व आहे का? देशात आरक्षण आणि जातीचे राजकारण करून समाजाला भडकावत आहेत म्हणून की विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची इच्छा व्यक्त करतात म्हणून गर्व आहे?
पंतप्रधान मोदींविषयी तुमच्या नेत्यांनी काय-काय म्हटले आहे, असे खर्गेंना उद्देशून म्हणत नड्डा म्हणाले, मोदींविषयी कधी म्हटले गेले की, मोदी तेरी कब्र खुदे, कधी नीच, कधी मौत का सौदागर तर कधी विषारी साप म्हटले गेल. कधी विंचू, चूहा, रावण, भस्मासूर, नालायक, कुत्ते की मौत मरेगा, मोदी को जमीन में गाड देंगे, राक्षस तर कधी हिंदू जिन्ना, औरंगजेबाचा आधुनिक अवतार, हिंदू दहशतवादी, नामर्द, चौकीदार चोर है, असे म्हटले गेल्याचे नड्डा यांनी पत्रात लिहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.