BJP 'INDIA' Politics : भाजपाची तिरकी चाल ; 'इंडिया' बाबत मोठा निर्णय

National Politics : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुलामगिरीचे प्रतीक म्हणून 'इंडिया'हा शब्द काढून फक्त 'भारत' हा शब्द वापरण्याची मागणी खासदार नरेश बन्सल यांनी केली होती.
BJP 'INDIA' Politics :
BJP 'INDIA' Politics :Sarkarnama

New Delhi News: भाजपला शह देण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली असून निवडणुकीच्या तयारीलाही लागली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांनीही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पण आता 'इंडिया'बाबत भाजपाने मोठी चाल खेळली आहे.

भारतीय राज्य घटनेतून 'इंडिया' हे नाव काढून टाकण्यासाठी विधेयक आणले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भारतीय संविधानातूनहा शब्द कायमचा हटवण्याचा भाजपचा मानस असल्याचेही सांगितले जात आहे. त्यासाठी भाजपने तयारी देखील सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि विरोधी पक्षांचा हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.

BJP 'INDIA' Politics :
Pankaja Munde News: घर शिवसेनेचे, मफलर राष्ट्रवादीची अन् सत्कार भाजपच्या पंकजा मुंडेंचा!

दरम्यान, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये भारताच्या व्याख्येसाठी वापरण्यात आलेला 'इंडिया' हा शब्द काढून टाकण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.अलिकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही 'इंडिया'ऐवजी भारत हा शब्द वापरण्याचे लोकांना आवाहन केले होते.

“शतकांपासून आपल्या देशाचे नाव भारत आहे.असं विधान त्यांनी केलं होतं. 11 ऑगस्ट रोजी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी 1860 मध्ये बनवलेले IPC, CrPC (1898) आणि भारतीय पुरावा कायदा (1872) गुलामगिरीची चिन्हे म्हणून वर्णन केले होते.सध्याच्या विधेयकांच्या जागी भारतीय नागरी संरक्षण संहिता, 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता, 2023 आणि भारतीय पुरावा विधेयक, 2023 ही तीन नवीन विधेयके मांडण्यात आली. याशिवाय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुलामगिरीचे प्रतीक म्हणून 'इंडिया'हा शब्द काढून फक्त 'भारत' हा शब्द वापरण्याची मागणी खासदार नरेश बन्सल यांनी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com