राजकीय समीकरणं बदलल्यानं राज्यसभा निवडणुकीत भाजपला बसणार दणका!

मागील सहा वर्षात विविध राज्यांमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे 'एनडीए'कडील सध्याच्या 31 जागांपैकी सात ते नऊ जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
BJP Latest Marathi News
BJP Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढील महिन्यात राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या 'एनडीए'ची (NDA) पीछेहाट होणार असल्याचे चित्र आहे. मागील सहा वर्षात विविध राज्यांमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे 'एनडीए'कडील सध्याच्या 31 जागांपैकी सात ते नऊ जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (Rajya Sabha Election latest Marathi News)

देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी तर दोन अन्य जागांवर 13 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यापैकी सध्या भाजपकडे 25 तर मित्रपक्षांकडे सहा जागा आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूपीए'कडे (UPA) 13 जागा आहे. यूपीएच्या जागांमध्ये दोन ते चार जागांची वाढ होण्याची शक्यता आहे. (BJP Latest Marathi News)

BJP Latest Marathi News
राजकीय घडामोडींना वेग : संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची अट; तरच राज्यसभेचे तिकीट!

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठं यश मिळालं आहे. येथील 11 जागांपैकी सध्या भाजपकडे पाच, समाजवादी पक्षाकडे तीन, बसपाकडे दोन आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. सद्यस्थितीत भाजपला सात ते आठ जागा मिळू शकतात. तर बसपा व काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.

महाराष्ट्रात भाजपचे नुकसान

महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक होणार असून सध्या भाजपकडे तीन जागा आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे प्रत्येक एक जागा आहे. सध्याचे संख्याबळ पाहता भाजपला दोन जागा मिळतील. तर आघाडीने आकडे जुळवून आणल्यास एका जागेचा फायदा होऊ शकतो.

BJP Latest Marathi News
ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका; सर्वोच्च न्यायालायकडून मध्य प्रदेशला मोठा दिलासा

राजस्थान, छत्तीसगडमध्येही जागा कमी होणार

राजस्थानात चार जागा असून सध्या भाजपचा तीन जागांवर कब्जा आहे. सध्याची राजकीय समीकरणं पाहता भाजपला केवळ एकच जागा मिळू शकते. तर काँग्रेसने अपक्ष आणि अन्य पक्षांशी हातमिळवणी करून संख्याबळ मिळवल्यास तीन जागा मिळतील. राजस्थानप्रमाणे छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. इथे दोन जागा असून भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. आता या दोन्ही जागा काँग्रेसकडे जातील.

तमिळनाडूत युपीएला फायदा, आंध्रमध्ये भाजपचे नुकसान

तमिळनाडूमध्ये सहा जागांसाठी निवडणूक होणार असून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एआयडीएमकेची एक जागा कमी होईल. तर डीएमकेला चार जागा मिळतील. यातील एक जागा काँग्रेसला दिली जाऊ शकते. तर आंध्र प्रदेशात चार जागांपैकी एकही जागा भाजपला मिळणार नाही. सध्या तीन जागा भाजपजवळ तर एक जागा डीएमकेकडे आहे. या चारही जागा वायएसआर काँग्रेसच्या पदरात पडतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com